नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करत असताना विविध उपक्रम राबवत आहेत. शनिवारीही महापे वाहतूक शाखेने वाहनांच्याद्वारे होणारे वाहन प्रदूषण आणि त्यावरील उपाय याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या जनजागृतीत विद्यार्थ्यांचा सहभाग होता. नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातात. वाहन प्रदूषण आरोग्यास घातक आहे. त्यामुळे लोकांना अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. महापे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासित अली सय्यद यांनी पुढाकार घेऊन जनतेमध्ये वाहन प्रदूषण बाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in