नवी मुंबई : मराठा आरक्षण मागणीसाठी आलेल्या मोर्चाने नवी मुंबईत एक रात्र व दोन दिवस मुक्काम केला. या दरम्यान मागणीसाठी एक तर मागणी पूर्ण झाल्यावर एक अशा एकूण दोन सभा झाल्या. या दोन्ही वेळेस लाखोंचा जनसमुदाय जमला होता. हे पूर्वनियोजत होते मात्र तरीही शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. सार्वजनिक वाहतूकमध्ये वाहतूक बदल, वाहतूक बंद आदींबाबत कुठल्याही सूचना न दिल्या जाणे आणि अचानक एखादा रस्ता बंद केल्याने वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते.

सकल मराठा आरक्षण मागणीसाठी २० तारखेला जालन्यातून मुंबईत मराठा दिंडी मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. हा मोर्चा शुक्रवारी पहाटे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धडकला. यावेळी पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सामान्य नागरिकांना बसला. मोर्चा येणार कधी, किती मोर्चेकरी असणार, कुठे उतरणार , सभा कुठे कधी घेणार याबाबत अगोदरच परवानगीसारखे सोपस्कार पार पडल्याने पोलिसांना सर्व माहितीही पूर्वीपासून होती. तरीही पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयाचा अभाव दिसून आला. याचा सर्वाधिक फटका वाशी, कोपरखैरणे, घणसोली तसेच ऐरोलीतून मुंबई वा बेलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसला.

Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?

हेही वाचा : मराठा आरक्षण आंदोलनाचा जेएनपीए बंदराला फटका, कंटेनर न आल्याने निर्यातीची जहाजे बंदरात अडकली

कोपरखैरणेतून ब्ल्यू डायमंड चौकातून कोपरीकडे वळवण्यात आलेली वाहतूक अचानक अग्निशमन मंदिर चौकापासून डावीकडे वळवण्यात आली. तर वाशी स्टेशन वा मुंबईकडून कोपरखैरणे दिशेला जाणाऱ्या वाहतुकीला कुठून जावे याचे मार्ग ऐन वेळी बंद करण्यात आले. गर्दी वाढली असे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सांगितले. मात्र गर्दी वाढणारच हे माहिती असताना नियोजन चुकले होते. त्याचबरोबर वाशी-कोपरखैरणे, वाशी-घणसोली असा शेअर रिक्षाचालक, बेस्ट एनएमएमटी चालकांनाही मार्ग बदल वा बंद केल्याची माहिती दिली नसल्याने प्रवाशांना अर्ध्या वाटेत उतरावे लागत होते.

हेही वाचा : उरणमध्ये एनएमएमटीच्या ब्रेक डाऊन होणाऱ्या बसची संख्या वाढली, भर रस्त्यात बस बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त

अगोदर एपीएमसीमधील माथाडी चौकात सभा स्थळ होते. सुट्टी असल्याने या परिसरात तुरळक वाहतूक असते. त्यामुळे सभेमुळे शहरात फारसा अडथळा झाला नसता. विशेष म्हणजे आदर चौकात स्टेजदेखील उभा केले होते. या ठिकाणी सभा घेणे, छ. शिवाजी महाराज चौकात छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालणे आणि मुंबईकडे मार्गस्थ होणे असा जरांगे यांचा नियोजित कार्यक्रम होता. मात्र एपीएमसीतील सभा छ. शिवाजी महाराज चौकात झाली. त्यात सुदैवाने हे सर्व सुट्टीच्या दिवसात झाल्याने मोठा गोंधळ उडाला नाही.

बस प्रवाशांचे हाल

● सर्वात मोठा गोंधळ असा होता की पुढे कुठे मार्ग बंद वा सुरळीत आहे, यांच्या सूचनाच सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतील लोकांपर्यंत पोहचत नव्हत्या.

● शनिवारी सकाळीही ऐरोली, मुलुंडकडून वाशी स्टेशन दिशेला येणाऱ्या बस मिलेनियम बिझनेस पार्कपर्यंतच येत होत्या. मात्र प्रवासी मागतील तेच तिकीट दिले जात होते. यातून प्रवासी आणि वाहन यांच्यात शाब्दिक बाचाबाची होत होती.

● रस्ता सुरळीत असेल तरच गाडी पुढे जाईल असे प्रवाशांना सांगण्यात येत होते. धक्कादायक म्हणजे बेस्ट एम बी पी येथेपर्यंतच येत होती मात्र एनएमएमटी पुढे कोपरखैरणे तीन टाकीपर्यंत येत होती. हा गोंधळ संध्याकाळी चारपर्यंत सुरू होता.

हेही वाचा : पनवेल : उलवेतील घरे सहा लाखांनी स्वस्त सदनिकाधारकांना दिलासा, किमंत २७ लाख रुपये

“कायदा सुव्यवस्था राहावी म्हणून वेळोवेळी योग्य ते निर्णय घेतले. यासाठी वाहतूक मनपा विभागाशी समन्वय साधला जात होता.” – विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

“मोठी गर्दी त्यात दुसऱ्या दिवशीही सभा नियोजनात नव्हती. आपण होणारी गर्दी पाहून टप्प्या टप्प्याने वाहतूक बदल केले. जेणेकरून त्रास होऊ नये. या बदल बाबत एनएमएमटी प्रशासनास ही कळवण्यात आले होते.” – तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

Story img Loader