नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक फळ बाजारात उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र त्याला अद्याप ओसी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने इमारत वापरात आणता आलेली नाही. पुढील महिन्यात ओसी प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती फळ बाजार अभियंता यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्च २०१२मध्ये या बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. हे काम जून २०१७ अखेर हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आता काम पूर्ण होऊनही तंत्रिक बाबींमुळे ओसी प्रमाणपत्र रखडले होती. फळ बाजारात ७३२ मोठे गाळे तर २९७ लहान गाळे आहेत. मात्र वाढता वापर पाहता गाळ्यांची, वाहन पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांकडून ३१ नागरिकांना मोबाइल सुपूर्द

तसेच बाजार आवारात इतर कामांसाठी लागणारी कार्यालायीन जागा अपुरी पडत असल्याने बाजार समितीने आवारातच बहुउद्देशीय इमारत उभारण्याचे काम हाती घेतले होते. या बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे.

हेही वाचा : उरण: जेएनपीए बंदर मार्गावर रसायनाचा टँकर उलटला, बंदराकडे जाणारा रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू

बाजार समितीच्या बहुउद्देशीय सुविधा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून सिडकोचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले असून आता ओसी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील महिन्यात ओसी प्रमाणपत्र मिळेल अशी अपेक्षा आहे.

सुहास जोशी, अभियंता, फळ बाजार समिती
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai residents will get occupancy certificate for multi purpose building after two years css