उरण : जगातील अत्याधुनिक बंदर म्हणून बिरूद मिरवणाऱ्या जेएनपीटीला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ते पाण्यानी भरले असून या रस्त्यावर झालेल्या खड्डे आणि त्यातील चिखलामुळे नागरिकांनी त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गाने उरणमधील एसटी व एन. एम. एम. टी. व इतर प्रवासी वाहनेही प्रवास करीत आहेत. त्याचप्रमाणे बंदरातील मालाची ने आण करणारी शेकडो मालवाहतूक वाहनेही ये-जा करीत आहेत. एकीकडे जेएनपीटीला जोडणाऱ्या जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीटी ते नवी मुंबईतील आम्रमार्ग असे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्यांच्या उभारणीसाठी अडीच हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मात्र ३४ वर्षांपूर्वी जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या उरण पनवेल मार्ग ते करळ मार्गे जेएनपीटी या मार्गाची दुरावस्था झाली आहे.

हेही वाचा : समुद्राच्या उधाणाने नादुरुस्त बंदिस्तीच्या कामाला सुरुवात, नोव्हेंबरमध्ये होणार कायमस्वरूपी मजबुतीचे काम

हेही वाचा : सहा महिन्यात दुप्पट पैसे… आमिषाला बळी पडून सव्वादोन लाखांची फसवणूक

साधारणतः ३६ वर्षांपूर्वी जेएनपीटी बंदराचे काम मित्सुबी या जपानी कंपनीने केले. त्यावेळी या मुख्य रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती. सुरुवातीला जेएनपीटी हे एकमेव बंदर कार्यान्वित होते आणि जेएनपीटी बंदराला जोडणारा एकमेव मार्ग होता. मात्र तरीही या मार्गावर खड्डे पडले नव्हते. सध्या या मार्गावर उरण पनवेल मार्ग ते करळ गाव दरम्यानच्या रस्त्याला दोन्ही बाजूने प्रचंड खड्डे आहेत. या खड्डयात चिखल आणि पाणी साचू लागले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या खड्डे आणि चिखलातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जेएनपीटी बंदराला जोडणारा हा पहिला मार्ग असून अनेक वर्षे या मार्गावरून जड वाहने ये जा करीत आहेत. मात्र मजबूत बांधण्यात आलेल्या या रस्त्यावर खड्डे नव्हते. या रस्त्यावर फेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्यानंतर खड्डे पडू लागल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे मत निलेश तांडेल यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader