नवी मुंबई: पुणे येथील मद्यपान करून गाडी चालवित निष्पाप जीवांचा बळी घेतला गेला. त्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह सध्या चर्चेचा विषय झाला आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबई आरटीओने ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई ही विशेष मोहीम हाती घेऊन सोमवारी कारवाईला सुरुवात केली. मात्र ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस आढळल्या नसून इतर त्रुटी आढळलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरातील सायन पनवेल महामार्गावरील तुर्भे, बेलापूर, नेरुळ याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. सध्या पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह घटनेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये निष्पाप जीवांना मात्र आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. अशी घटना नवी मुंबई शहरात घडू नये याकरिता नवी मुंबई आरटीओ विभागाने ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल ११ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र यामध्ये अद्याप पर्यंत एकही मध्यपान करून गाडी चालवणारे वाहन चालक आढळले नाहीत. दुचाकी ,चारचाकी, टेम्पो रिक्षा इत्यादी वाहन चालकांची तपासणी करण्यात आली आहे. परंतु यामध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश होता. विना हेल्मेट, ट्रिपल सीट, वाहन परवाना नसणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, अवैध प्रवासी वाहतूक तसेच वाहनांच्या क्षमतेपेक्षाही अधिक प्रवासी नेणे इत्यादी अवैध वाहतूक अशा वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

हेही वाचा : नवी मुंबई : ‘एपीएमसी’त जुन्नर हापूसचा हंगाम

पुण्यातील घटनेचे पुनरावृत्ती होऊ नये याकरता नवी मुंबई शहरात ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये आत्तापर्यंत कारवाई केलेल्या वाहन मध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह केस आढळली नाही.

हेमांगिनी पाटील , उपप्रादेशिक अधिकारी, नवी मुंबई आरटीओ