नवी मुंबई : आपल्या बँक खात्याची कुठलीही माहिती कोणालाही दिलेली नसताना तसेच ओटीपी येईल असा कुठलाही व्यवहार केला नसतानाही एका निवृत्त अधिकाऱ्याच्या बँक खात्यातील १ लाख ३५ हजार २१ रुपये अन्य अनोळखी व्यक्तीच्या खात्यात वळते झाले आहेत. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणूक केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा: पनवेल: पावसाळ्यात बुधवार व गुरुवार सिडकोवासियांचा पाणी पुरवठा बंद राहणार
जॉईस अलेक्स असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अलेक्स हे सी उड्स येथे राहत असून ८ ८ तारखेला संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी त्यांना दोन संदेश आले त्यानुसार त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९९ आणि ३५ हजार २२ रुपये दोन वेगवेगळ्या खात्यात वळते झाले होते. अलेक्स यांनी कोणालाही धनादेश दिले नव्हते वा बँक खात्याची माहिती दिली नव्हती तरीही अशी रक्कम संमती शिवाय अनोळखी खात्यात वळती झाल्याने याबाबत त्यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. पोलिसांनीही या तक्रार अर्जाची दाखल घेत अनोळखी व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा आज (मंगळवारी) दाखल करण्यात आला आहे.