नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध उपनगरांत वाहतूक शाखा असून मागील १५ वर्षांपासून सीवूड्स वाहतूक शाखेला गायमुख चौकात गेल्या १५ वर्षांपासून कामकाज करावे लागत होते. अपुऱ्या जागेत हा कारभार सुरू असल्याने सीवूड्स वाहतूक शाखेला हक्काची जागा कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर १५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सीवूड्स वाहतूक शाखेला सीवूड्स पूर्व-पश्चिम भागाला जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली हक्काची जागा सिडकोकडून प्राप्त झाली आहे. ६० वर्षांच्या करारानुसार वाहतूक शाखेला ही जागा देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीवूड्स रेल्वेस्थानकातील मॉलमुळे या परिसरात सातत्याने वाहनांची गर्दी असते. त्यामुळे या परिसरात हक्काची जागा वाहतूक विभागाला हवी होती. सीवूड्स वाहतूक शाखेच्या अंतर्गत नेरुळ, सीवूड्स तसेच बामणडोंगरीपर्यंतचा परिसर येतो. सीवूड्स रेल्वे स्थानकाच्यावरील भागात असलेल्या नेक्सस सीवू्डस ग्रॅन्ड सेन्ट्रल मॉलमुळे या परिसरात पूर्व-पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्किंग होते. मॉलबाहेरच्या मुख्य रस्त्यालगत दुतर्फा वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांनी चालायचे कुठून असा प्रश्न पडतो.

हेही वाचा : नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांकडून ३१ नागरिकांना मोबाइल सुपूर्द

सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला सातत्याने वाहतूककोंडी होत असते. मॉलमुळे या परिसरातून नीट चालायलाही मिळत नाही. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच दुतर्फा रस्त्यालगतचे पार्किंग हटवले पाहिजे. आतापर्यंत वाहतूक विभागाला जागाच नसल्याने कारवाई केलेली वाहने ठेवायची कुठे असा प्रश्न निर्माण होत असे. आता वाहतूक विभागाने स्थानक परिसरातील वाहतूक प्रश्न सोडवावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

समीर बागवान, पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

हेही वाचा : उरण: जेएनपीए बंदर मार्गावर रसायनाचा टँकर उलटला, बंदराकडे जाणारा रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू

गायमुख चौकात अपुऱ्या जागेत सीवूड्स वाहतूक शाखेचा कारभार होता. सिडकोकडून सीवूड्स उड्डाणपुलाखालील हक्काची जागा प्राप्त झाली आहे. सध्या आचारसंहिता सुरू आहे. तात्पुरत्या स्वरुपात प्राथमिक कामकाज नव्या जागेत सुरू झाले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार आचारसंहितेनंतर औपचारिक उद्घाटन करण्यात येईल.

कृष्णा धामापूरकर, वरिष्ठ वाहतूक निरीक्षक, सीवू्डस
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai seawoods traffic police branch gets place after 15 years css