नवी मुंबई: नवी मुंबईत डॉक्टरांच्या प्रतिमेला काळिमा फसवणारी घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याला १४ वर्षांनी अपत्य झाले ते हि जुळे झाले मात्र त्यांची तब्येत नाजूक असल्याने त्यांना अति दक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र ९० हजार भरूनही वारंवार बिल द्या असा तगादा रुग्णालयाने लावला होता. तसेच उद्या जर बिल जमा केले नाही तर उपचार थांबवण्यात येईल असा इशारा दिल्याने त्या निष्पाप जुळ्यांच्या वडिलांनी त्राग्याने थेट आत्महत्येचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहली असून त्यात आत्महत्येचे कारण डॉक्टरांनी लावलेला बिलाचा तगादा असल्याचे नमूद करण्यात आले आहे . या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

नेरुळ येथील मनपा वाचनालयात सुरक्षा रक्षकाचे काम नरेंद्र गाढे हे करत असून ते शिरवणे  येथे राहतात. त्यांना विवाह झाल्या नंतर तब्बल चौदा वर्षांनी अपत्य झाले. जुळ्या मुलांना त्यांची पत्नी वंदना यांनी फर्टीलिटी आणि रिसर्च सेंटर रुग्णालय नेरुळ येथे जन्म दिला. चार दिवसापूर्वीच त्यांना पोटात वेदना होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी त्यांना  जुळी मुले झाली.त्यांची तब्येत नाजूक असल्याने अति दक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र या बिलापोटी गाडे यांनी अगोदर ४५ हजार नंतर ९० हजार अशी बिले भरली होती. मात्र तरीही बिल वाढत चालल्याने त्यांनी आपल्या पत्नीचा डिस्चार्ज घेतला. दोन जुळी मुले अद्याप अति दक्षता विभागात उपचारार्थ ठेवण्यात आले होते.  मात्र १ लाख ३५ हजार बिल भरल्यानंतर देखील त्यांना आणखी दीड लाख रुपये भरण्यासाठी डॉक्टरांकडून वारंवार फोन करून त्रास दिला जात होता. बिल भरले नाही तर तुमच्या मुलांचा व्हेंटिलेटर काढण्यात येईल अशी धमकी या डॉक्टरांकडून देण्यात येत होती.

Aditya Thackeray criticism of the mahayuti government regarding mumbai land Adani  Mumbai
मुंबईतील जमिनी अदानींच्या घशात; आदित्य ठाकरे यांची महायुतीवर टीका
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
CCTV, Thane district, Thane, Thane latest news,
उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही
Hospital for animals set up by Mumbai Municipal Corporation in collaboration with Tata Trust Mumbai news
प्राण्यांसाठीच्या रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण, पण उद्घाटन राहिले…; मुंबई महापालिकेने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उभारले रुग्णालय
woman killed after speeding dumper hit on karve road
कर्वे रस्त्यावर पुन्हा अपघात;डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू , अपघातानंतर डंपरचालक पसार
thane building
डोंबिवलीत कोपरमध्ये रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी करणाऱ्या बांधकामधारकांना साहाय्यक आयुक्तांची नोटीस
A college youth was robbed by a koyta on Hanuman hill pune
हनुमान टेकडीवर कोयत्याच्या धाकाने महाविद्यालयीन तरुणाची लूट; चोरट्यांच्या मारहाणीत तरुण जखमी
Musheer Khan Road Accident Health Update His Car Overturned After Hitting Divider
Musheer Khan Health Update: मुशीर खानचा अपघातही ऋषभ पंतप्रमाणेच, अधिकृत माहिती आली समोर, मानेला फ्रॅक्चर असून मुंबईत होणार पुढील उपचार

हेही वाचा : उरणमध्ये निर्भयाची क्रूर हत्या, नागरीक संतप्त; आरोपीला पकडल्याशिवाय मृतदेह न घेण्याची कुटुंबाची भूमिका

गाडे यांची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने त्यांना हा त्रास सहन झाला नाही आणि डॉक्टरांच्या सततच्या तगाद्याला कंटाळून आपल्या नेरळ शिगवणे येथील राहत्या घरी त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून गळफास घेतला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत डॉक्टरांच्या तगाद्या मुळे आपण आत्महत्या करीत असून याला डॉकटर व हॉस्पिटल जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मयत नरेंद्र गाडे यांनी केली आहे. अशी माहिती आत्महत्या केलेले नरेंद्र गाढे यांचे मेव्हणे दादासाहेब म्हस्के यांनी दिली. आत्महत्येचा प्रकार शनिवारी सकाळी समोर आला मात्र याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा रात्री पर्यंत दाखल झाला नव्हता. मात्र नातेवाईक आणि भीम आर्मीने यात लक्ष घातल्याने अखेर पोलिसांनी याची दखल घेतली अशी माहिती मयत यांच्या अन्य एका नातेवाईकाने दिली. याबाबत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे अशी जुजबी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी दिली. या प्रकरणी तेरणा रुग्णालय प्रशासनाला अनेकदा प्रयत्न करूनही संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.