नवी मुंबई : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्यावतीने आज रविवार (दि. १५.१०.२०२३) रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी ५ व्या आणि ६ व्या मार्गासाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे-कल्याण ५ व्या आणि ६ व्या मार्गावर मध्यरात्री ०१.०० ते ०४.०० पर्यंत कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५ व्या आणि ६ व्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाऊन मेल एक्स्प्रेस गाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हेही वाचा : नवी मुंबई : मद्य दिले नाही म्हणून हाणामारी; पहाटे चारची घटना

चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ०४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

हेही वाचा : नवी मुंबई : ओबीसी समाजाचा कोटा कमी न होता मराठा समाजला आरक्षण दिलं पाहिजे, काँग्रेसची मागणी

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८ ) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai today central railway mega block css