नवी मुंबई : शिळफाटा नजीक रस्ते काम आणि तुर्भे रेल्वेस्थानकासमोरील उड्डाणपुलाच्या कामामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा सामना सलग दोन महिने तरी करावा लागणार आहे. ही वाहतूक कोंडी ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे ते महापे दरम्यानच्या परिसरात सर्वाधिक होत आहे. याबाबत पोलिसांनीही अतिरिक्त पोलीस बळ नियुक्त केले आहे.

कल्याण-शीळफाटा रस्त्यावर अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे अपेक्षित वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना शहराअंतर्गत केवळ रात्री ११ ते पहाटे पाच आणि दुपारी दोन ते चार याच वेळेस वाहतूक परवानगी देण्यात आली आहे. तसेच येथील वाहनांना मुंब्रा बाह्यवळण, कल्याण फाटा, शिळफाटा मार्गावर दिवसा अवजड वाहनांना प्रवेशबंदी आदेश ठाणे वाहतूक पोलीस विभागाने दिले आहेत. ही सर्व वाहतूक ठाणे-बेलापूर मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर गेल्या काही दिवसांत वाहन संख्येत वाढ झाली आहे. त्यात ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वेस्थानकासमोर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक एमआयडीसी अंतर्गत रस्त्यावर वळवण्यात आली आहे.

Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
This year almost all tours during Diwali holidays have house full registration
दिवाळीच्या सुट्टीत सर्वच टूर्स कंपन्यांसाठी ‘हाऊसफुल’ नोंदणी
best bus route change due to traffic congestion in dadar for diwali shopping
दादरमध्ये वाहतूक कोंडी; ‘बेस्ट’ मार्गात बदल करण्याची नामुष्की
pmc appealed pune residents to celebrate eco friendly diwali
दिवाळी अशी करा साजरी, महापालिकेने का केले हे आवाहन
Dombivli Phadke Road Diwali, Phadke Road,
डोंबिवलीतील फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष, विद्युत रोषणाईने फडके रोड झळाळला
pune police return lost mobile sets to citizens on diwali occasion
दिवाळीत पोलिसांची अनोखी भेट; गहाळ झालेले मोबाइल संच नागरिकांना परत

हेही वाचा : उद्याचा माथाडी कामगार संप पुढे ढकलला, नागपूर येथील बैठकीत निर्णय 

ठाणे-बेलापूर मार्गावर खैरणे एमआयडीसीकडून ही वाहतूक एमआयडीसीत वळवून इंदिरा नगर येथे मुख्य रस्त्याला जोडण्यात आली आहे तर ठाण्याकडे जाणारी वाहनेही याच मार्गाने मार्गस्थ होण्यासाठी पर्याय देण्यात आले आहेत. मात्र यातून हलकी वाहने वगळण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसांपासून ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वेस्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याची केवळ तयारी सुरू आहे. यानिमित्ताने अडथळे लावणे, मार्किंग करणे आदी कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर खैरणे एमआयडीसी येथून बुधवारी दोन्ही मार्गांवर दुपारी वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा : अनेक ठिकाणी बस थांब्यांची दुरवस्था; घणसोली नाका, तळवली, गोठिवली येथील बसथांब्यांचा प्रश्न

तसेच शिळफाटा कल्याण फाट्याकडून येणारी वाहने महापे मार्गे ये-जा करीत असल्याने महापे ते ठाणे आणि महापे ते ऐरोलीमार्गे मुंबई या दोन्हीकडील मार्गिकांवर वाहतूक कोंडी झाली होती. संध्याकाळी पाचनंतर मात्र वाहतूक कोंडी बऱ्यापैकी सुटली होती. “तुर्भे उड्डाणपूल निर्मितीचे काम करण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आजपासून व्हाईट हाऊस येथून बेलापूरकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी वाहतूक कोंडी झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शखाली योग्य तिथे वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.” – सय्यद बशीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, महापे

हेही वाचा : उरणमधील रुग्णालयाच्या भूखंडावर संक्रांत; भूखंडावर ‘सीआरझेड’, उरणकरांना शासकीय रुग्णालयाची प्रतीक्षाच

चार दिवस नेरुळ येथील सेवा रस्ता बंद

नेरुळ येथील डॉ. डी वाय पाटील मैदानात १४ ते १७ डसेंबर दरम्यान महिला क्रिकेट आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याने मैदान प्रवेशद्वारासमोरील सेवा रस्त्यावर प्रवेश बंदी जाहीर केली आहे. महत्वांच्या व्यक्तींसाठी भिमाशंकर सोसायटी ते एल. पी. रिक्षा स्टॅण्ड या दरम्यानच्या सेवा रस्ता हा निश्चित करण्यात आला आहे. वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास मनाई केली आहे. याला पर्यायी मार्ग म्हणून उरण फाटा ते एल. पी. उड्डाणपूल दरम्यानच्या रस्त्याने इच्छित स्थळी जातील, अशी माहिती वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.