पनवेल : येथील वळवली गावातील आदिवासी बांधवांनी बुधवारी सकाळी पनवेल ते मंत्रालय मोर्चाला सूरुवात केली. दुपारी मोर्चा मंत्रालयाजवळील आझाद मैदानात पोहचला. मागील ५० वर्षांपासून वळवली गावातील आदिवासी आणि कातकरी बांधव सर्वे क्रमांक ४९, खाते क्रमांक ११२ या जमिनीचे क्षेत्र कसत असून त्यावर वहिवाट आहे.
हेही वाचा : मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर स्वतः शिका, दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका; अन्यथा आर्थिक फटका…
यावरील वास्तव्य आदिवासी बांधवांचे असल्याने येथील संबंधित आदिवासी बांधवांनी केलेले अतिक्रमण कायद्याने नियमित करा तसेच सर्वे क्रमांक ४९ मधील ४७.४४ हेक्टर जमीनीचे क्षेत्र भूसंपादनातून वगळण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली. खांदेश्वर वसाहतीच्या मुख्य रस्त्यावरुन आदिवासी बांधव ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, या घोषणा देत मोर्चा मार्गस्थ झाला.