नवी मुंबई : रबाले पोलीस क्षेत्रात गुरुवारी रात्री नऊ ते सव्वानऊ या केवळ पंधरा मिनिटात दोन ठिकाणी सोन साखळी चोरी झाली आहे. या प्रकरणी शुक्रवारी (ता. २८) बाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेतील आरोपींचे आणि दुचाकीचे वर्णन सारखेच आहे. त्यामुळे आरोपी एकच असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला
गुरुवारी ठाणे येथे राहणाऱ्या सुरेखा ठिकडे या आपल्या नातेवाईकांच्या कडे कार्यक्रम निमित्त आल्या होत्या. रात्री कार्यक्रम संपवून ठाणे कडे जाणाऱ्या रिक्षाची वाट घणसोली सेक्टर ९ येथे माथाडी भवन समोर उभ्या होत्या. काही वेळात एका दुचाकीवर बसून आलेले दोन युवक त्यांच्या समोर येथून थांबले व पीछे गेट है असे सांगत सुरेखा यांचे लक्ष विचलित केले व काही कळण्याच्या आत त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे मंगळसूत्र आणि अर्धा टोला वजनाची ठुशी असे ७० हजार रुपये किमतीचे दागिने बळजबरीने हिसकावून पळून गेले. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात त्या तक्रार देण्यास गेल्या असाता काही वेळातच त्या ठिकाणी मुक्ता पाटील या ७० वर्षीय जेष्ठ नागरिक महिला हजर झाल्या. त्यांच्या हि गळ्यातील १ लाख ७५ हजार रुपयांची पाच तोळे वजन असलेली चिंचमाळ बळजबरीने हिसकावून नेली होती. मुक्ता या घणसोली डी मार्ट समोरील बस थांब्यावर एका रिक्षात बसत असताना दुचाकी वरून आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गळ्यातील चिंचमाळ बळजबरीने हिसकावून पोबारा केला .
हेही वाचा : नवी मुंबई: हुक्का पार्लरवर धाड, तीन जणांवर कारवाई
हे दोन्ही गुन्हे गुरुवारी रात्री सव्वा नऊ ते साडे नऊ दरम्यान घडले असून दोन्ही गुन्ह्यातील अंतर एक किलोमीटरच्या आतील आले. यात धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही फिर्यादींनी आरोपींचे केलेले वर्णन सारखे आहे. त्यामुळे रबाळे पोलिसांनी एकच गुन्हा नोंद केला असून त्यात दोन्ही घटनांबाबत नमूद केलेले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पवार तपास करीत आहेत.