उरण : स्वच्छ भारत अभियानाचा डंका वाजत असला तरी उरणच्या ग्रामपंचायती व येथील नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहतीतील कचऱ्याची विल्हेवाट न लावता तो सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर टाकला जात आहे. त्यामुळे या मोहिमेचे तीनतेरा वाजले आहेत. या कचऱ्याच्या घाणीने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उरणमधील अनेक गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून या ग्रामपंचायतींनी रस्त्यांचे डंपिंग ग्राउंड बनविल्याचे चित्र तालुक्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. अशा कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उरण हा मुंबई व नवीमुंबई शहरांचे उपनगर म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे. मात्र या तालुक्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या जनतेचा श्वास कोंडला गेला असुन नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या मोठया प्रमाणात केरकचरा हा चिरनेर-कोप्रोली, चिर्ले – दिघोडे, पिरवाडी – चारफाटा, द्रोणागिरी नोड तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
एकंदरीत शासन स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करत असताना गावातील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेचे तीनतेरा वाजवीत असून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे.तसेच ग्राम स्वच्छतेसाठी आग्रही असणारे महसूल विभाग,पंचायत समिती प्रशासन सुद्धा ग्रामपंचायतींच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा : आदई धबधब्यात पाय घसरून पडल्याने मामा, भाच्याचा मृत्यू
चिरनेर-कोप्रोली, चिर्ले – दिघोडे, पिरवाडी- चारफाटा, द्रोणागिरी नोड रस्त्यावरुन दररोज हजारो लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. उन्हाळ्यात काही प्रमाणात कचरा जाळला जात होता त्यामुळे दुर्गंधी येत नव्हती परंतु पावसामध्ये रस्त्यावर टाकलेला कचरा कुजून दुर्गंधी येऊ लागली आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना नाक मुठीत धरावे लागत आहे. रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे मत चिरनेर येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत नारंगीकर यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा : मोबाईल चोरीची तक्रार देण्यास गेला… आणि सुखद धक्का बसला… वाचा नेमके काय घडले
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीना डम्पिंग ग्राउंड नाही.यासाठी उरण तहसीलदार, सिडको तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्याचा तसेच डम्पिंग ग्राउंडसाठी पत्रव्यवहार केला आहे यांची माहिती घेणार आहोत. हा जनतेच्या आरोग्याशी निगडित प्रश्न असल्याने यावर लवकरच उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.पी.वाठारकर यांनी दिली.