नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने रस्त्यावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष नियोजन सुरू केले आहे. तसेच प्रत्येक विभागात अधिकृत भाजी मंडईही सुरू केली आहे. असे असले तरी घणसोली सेक्टर-७ येथील रुग्णालयासाठी आरक्षित असणार्या भूखंडावर भाजी विक्रेत्यांनी अनधिकृतपणे बस्तान मांडून अतिक्रमण केले आहे. नवी मुंबई महानगरपालिका अनधिकृतपणे भाजी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करते मग या भूखंडावर भाजी विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमण कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहेत का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.ॉ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर

सिडकोने शहराची निर्मिती करत असताना अनेक भूखंड आरोग्य ,शाळा, क्रीडा, उद्याने- मैदाने, नागरी विकास प्रकल्प इत्यादी सामाजिक उपक्रमांसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. हे भूखंड कालांतराने महापालिकेकडे हस्तांतर झाले. पालिकेने या भुखंडांवर आरक्षणाचे फलक देखील उभारले आहेत. मात्र या भुखंडाचा वापर न झाल्याने पालिकेने आरक्षित केलेल्या भुखंडावर फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. पावसाळयात या जमिनीवर मोठया प्रमाणावर झाडेझुडपेही वाढतात. भुखंडावर लावण्यात आलेल्या लोखंडी जाळया आणि गेट हा गंजल्याने काढून टाकण्यात आले आहेत. त्यातच या ठिकाणी रस्त्यावर बसणार्या भाजी विक्रेत्यांनी या मैदानावर अतिक्रमण केले आहे. भाजी विक्रेते, कांदा बटाटा विक्रेत्यांनी मागील काही महिन्यांपासून विनापरवाना व्यवसाय सुरू केला आहे.

घणसोलीतील महापालिकेच्या आरक्षित भुखंडावर अतिक्रमण केल्याबाबत पाहणी करून अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल. – संजय तायडे, विभाग अधिकारी, घणसोली

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai vegetable sellers encroachment on reserved land in ghansoli css