पनवेल : नवीन पनवेल येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीची तीन महिन्यांत अधिकचा परतावा मिळवून देतो या बहाण्याने २१ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नवीन पनवेल येथील सेक्टर १६ मधील विष्णू सोसायटीत राहणारे चंद्रशेखर दाबके यांची फसवणूक भामट्यांनी केली आहे.
हेही वाचा : उरणकरांवर पाणीटंचाईचे संकट; दोन्ही धरणांनी तळ गाठला
दोन वेगवेगळ्या नंबरवरुन चंद्रशेखर यांना जानेवारी महिन्यांत फोनवरुन टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅवरुन संपर्क साधून ET5Webtrading व ALL-VC या संकेतस्थळावरुन ट्रेडींग केल्यास अधिकचा परतावा मिळेल असे सांगण्यात आले. वेगवेगळ्या खात्यावर चंद्रशेखर यांनी त्यांच्या बॅंकेत जमा असलेली २१ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम वळती केली. मात्र कोणताही परतावा न मिळाल्याने अखेर चंद्रशेखर यांनी पोलीस ठाणे गाठले.