पनवेल: पनवेलमधील रस्त्यात पडलेल्या खड्यांमुळे अनेक अपघातांना दररोज वाहनचालक सामोरे जात आहेत. मात्र रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजता पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरुन दुचाकीने जात असताना २४ वर्षीय तरुणीला स्वत:चा जिव गमवावा लागला आहे. ही तरुणी दुचाकीवरुन तीच्या मित्रासोबत पळस्पे ते जेएनपीटी मार्गावर नांदगाव पुलावरुन जात असताना पुलावर पडलेल्या मोठ्या खड्यामुळे दुचाकीचे चाक आदळल्याने दोघेही दुचाकीवरुन खाली कोसळले. त्याच दरम्यान पाठीमागून येणा-या ट्रेलरच्या चाकाखाली २४ वर्षीय तरुणी ठार झाली. मृत तरुणीचे नाव मानसी रोकडे असे आहे. 

मुंबई (भायखळा) घोडपदेव येथील म्हाडा वसाहतीमध्ये राहणा-या मानसी त्यांचा मित्र आदेश लाड यांच्यासोबत माथेरान ते मुंबई असा दुचाकीवरुन प्रवास करुन घरी येत असताना रविवारी हा अपघात झाला. पळस्पे ते जेएनपीटी मार्ग हा कॉंक्रीटचा बांधला असला तरी त्यावरही ठिकठिकाणी खड्डे आहेत. नांदगाव पुलालगत मोठा खड्यात आदेश चालवित असलेल्या दुचाकीचे चाक आदळल्याने दोघेही रस्त्याच्या उजव्या बाजूला उडवले गेले. या दरम्यान आदेशच्या दुचाकीमागून भरधाव वेगाने ट्रेलर (क्रमांक एमएच ४३,यु. १६७३) येत होता. याच ट्रेलरच्या चाकाखाली मानसीचे शरीर आले. यात मानसीचा चेहरा, मान, पाठ यावर हे भरधाव ट्रेलरचे चाक गेल्याने ती ठार झाली.

10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Murder of woman in Hadapsar area body was kept in bed compartment
हडपसर भागात महिलेचा खून, मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघड
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

हेही वाचा : भाजपच्या बेलापुरात नाईकांचा ‘सांगली पॅटर्न’? वाढदिवसानिमित्त संदीप नाईकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

वाहनचालक कोणतीही वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला. पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र रस्त्यातील खड्डे वेळीच बुजविले असते तर मानसीचे प्राण वाचले असते. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. सरकारी प्राधिकरणा विरोधात कोणतीही कारवाई पनवेल शहर पोलीसांकडून केली नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येते. पोलीस ट्रेलरचालकाचा शोध घेत आहेत.