पनवेल: शाळेला सुट्या असल्याने मुले घराबाहेर खेळायला जात आहेत. नियोजित शहरात क्रीडांगण आणि उद्यानांचा अभाव आहेच परंतू उन्हाच्या तडाक्यामुळे इमारतीमध्ये खेळा असा आदेश पालकांकडून मुलांना केला जातो. मात्र इमारतीमध्ये खेळण्यासाठी अपुरी जागा असली की शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घरीच खेळण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र शेजारीच नराधम असेल तर मुलांच्या सूरक्षेचा प्रश्न निर्माण होताे. नवी मुंबईतील उलवे वसाहतीमध्ये राहणा-या एका नराधमाने बुद्धिबळ खेळायच्या नावावर साडेसात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला आहे.
हेही वाचा : एपीएमसी चटई क्षेत्र घोटाळा प्रकरणी २३ माजी संचालक सभापती सह सचिवा विरोधात गुन्हा दाखल
शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता उलवे वसाहतीमधील सेक्टर १९ येथील पृथ्वी हाईट्स या इमारतीमध्ये राहणा-या एका नराधमाने शेजारधर्माला काळीमा फासणारा प्रकार केल्याची तक्रार पालकांनी पोलीसांकडे केली आहे. साडेसात वर्षांची पिडीता बुद्धीबळ खेळण्यासाठी शेजारच्यांकडे गेल्यावर तीच्यावर अत्याचार करण्यात आला. सिक्रेट कोणालाच सांगू नये म्हणून या नराधमाने बालिकेला बजावले होते. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन यापूर्वीही पीडिता पहिली इयत्तेत असताना तीच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी ४० वर्षीय संशयीत आरोपी संदेश नरेंद्र पाटील याला एन.आर.आय. पोलीसांनी अटक केली आहे. एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतिश कदम यांनी या प्रकरणी तातडीने बलात्कार आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून रविवारी पहाटे साडेपाच वाजता नराधम संदेशला अटक केली.