पनवेल, उरण : मावळ लोकसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या पनवेल तसेच उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीशी संबंधित असलेल्या उमेदवारांनी मोठा विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिल्याचे चित्र सोमवारी निकालातून स्पष्ट झाले. पनवेल तालुक्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायतींवर शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने एकत्रितपणे विजय मिळविला. उरण तालुक्यातील जासई, दिघोडे व चिरनेर या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालावरही महाविकास आघाडीचा वरचष्मा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे भाजपचे या भागातील आ. प्रशांत ठाकूर आणि आ. महेश बालदी या दोघांच्या जाहीर सभा घेऊनही येथे त्यांच्या समर्थकांचा पराभव झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल तालुक्यामधील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल पनवेल तहसील कचेरीत सोमवारी दुपारी जाहीर झाले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नेते दि. बा. पाटील यांचे जन्मगाव असलेल्या जासई ग्रामपंचायतींमध्ये सर्वपक्षीय महाविकास आघाडीविरोधात भाजप अशी सरळ लढत झाली. सृष्टी म्हात्रे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे. सर्वपक्षीय महाविकास आघाडीचे १७ पैकी १२ सदस्य निवडून आले. तर सरपंचपदी आघाडीचे संतोष घरत (१९२५ मते) यांनी भाजपचे बळीराम घरत (१७७३ मते ) यांचा १५२ मतांनी पराभव केला.

हेही वाचा : वाढत्या वायू प्रदूषणामुळे रहिवाशांना मुखपट्टी लावण्याचे पनवेल पालिकेचे आवाहन

उरणमध्ये आमदार बालदींना धक्का

उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ‘एकला चलो रे’च्या भूमिका घेणाºया भाजपला सरपंच निवडीत भोपळाही फोडता आला नाही. चिरनेर ग्रामपंचायत निवडणुकीत महाआघाडीविरोधात भाजप असा सामना होता. सरपंचासह १७ जागांसाठी पाच प्रभागांतून ३० उमेदवार निवडणुकीच्र्या ंरगणात होते. प्रभाग क्रमांक ४ मधून महाआघाडीच्या भारती मनोज ठाकूर याआधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. चिरनेर गावाला पावसाळ्यात सातत्याने पुराचा सामना करावा लागत असल्याने भाजपने आणलेल्या निधीचा प्रचार केला. प्रचारात भाजपच्या महेश बालदी, प्रशांत ठाकूर या दोन्ही आमदारांनीही जाहीर सभा घेतल्या होत्या. मात्र महाआघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार भास्कर मोकल (३१२८ मते) यांनी भाजपचे उमेदवार प्रतीक गोंधळी (१२२४ मते) यांना १९०४ इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला. येथे १५ पैकी १४ सदस्य महाविकास आघाडीचे निवडून आले.

हेही वाचा : फुटबॉल सामना पाहण्यास नवी मुंबईत येताय? वाहतूक बदल वाचा 

निवडणूक निकाल आणि प्रचंड गर्दी

उरणमधील या महत्त्वपूर्ण आणि आर्थिक सबळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. बोकडवीरा येथील सिडकोच्या प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात चारचाकी वाहनांनी तोबा गर्दी केली होती. या वेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel and uran out of 17 gram panchayat mahavikas aghadi won at 10 gram panchayat css
Show comments