पनवेल : खारघर येथे ४ ते १२ फेब्रुवारी या दरम्यान संत शिरोमणी श्री निवृत्ती महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच ठिकाणी महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी लाखो दासभक्त खारघरमध्ये आले होते. त्यानंतर देशभरातून गायत्री परिवाराचे भक्तांनी याच ठिकाणी अश्वमेध यज्ञ राज्यपालांच्या उपस्थितीत झाला होता. त्यानंतर आताखारघर उपनगर शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र येथे सतत होणाऱ्या अध्यात्मिक सोहळ्यांमुळे शहराची ओळख अध्यात्मिकतेची शिकवण देणारी वसाहत अशी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पनवेल : व्काॅरीच्या स्फोटात एका कामगाराने प्राण गमावले, दोन जखमी

आठवड्याभराच्या या सोहळ्यासाठी देशातील तीन पीठांचे आचार्य, शंकराचार्य, संतांचे वंशज, वारकरी संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ कीर्तनकार, वारकऱ्यांसह राज्यातून हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याचा दावा आध्यात्मिक विचार प्रचारक सामाजिक संस्थेने केला आहे. या कार्यक्रमादरम्यान अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. पहाटे चार ते सकाळी दहा या वेळेत काकड आरती, हरिकीर्तन, पाच हजार ज्ञानेश्वरी वाचक, टाळकरी, तीन हजार मृदंग वादक आणि हजारो श्रोतृवृंद उपस्थित राहणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel at kharghar akhand harinam saptah between 4 to 12 february css