पनवेल: आदई येथील पॅन्थर अकादमीतील तरणतलावामध्ये पोहण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग पोहणे शिकविणा-या प्रशिक्षकाने केला आहे. महिला कपडे बदलण्यासाठी खोलीत गेली असता या प्रशिक्षकाने त्याच्या जवळील अॅपल कंपनीच्या मोबाइलच्या साहाय्याने महिलेचा व्हीडीओ काढला. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीनंतर १९ वर्षीय प्रशिक्षक आदित्य फडके याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा : खालापूर पथकर नाक्यावर वाहनांच्या रांगा
आदई येथील पॅन्थर अकादमीच्या तरणतलावात शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ३४ वर्षीय महिला पोहून आल्यावर त्या अकादमीच्या कपडे बदलण्याच्या खोलीत कपडे बदलत असताना आदित्य याने त्याच्याजवळील मोबाईल फोनमधून या महिलेचा व्हीडीओ काढल्याने संतप्त झालेल्या महिलेने याबाबत पोलीसांत धाव घेतली.