पनवेल : तळोजा वसाहतीमधील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर त्याच मुलीचे बनावट अश्लील छायाचित्र बनवून लघु संदेशाव्दारे वारंवार पाठविले. पीडीतेचे छायाचित्र न पसरविण्यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. या गंभीर प्रकरणाची दखल तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश काळदाते यांनी घेऊन पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलीसांनी विकृत मुलाविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नवी मुंबई : अल्पवयीन असल्यापासून घरफोडी… अट्टल आरोपीला अटक 

संबंधित पीडिता व पीडितेचा विनयभंग करणारा संशयीत १७ वर्षीय मुलगा तळोजा वसाहतीमधील सिडकोच्या महागृहनिर्माण प्रकल्पात राहतात. १५ मार्चला पीडितेला वारंवार लघुसंदेश पाठविल्याने पीडितेने वैतागून पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलीला रील्स बनविण्याचा छंद आहे. याचा फायदा घेऊन संशयीत मुलाने पीडितेच्या इन्स्टाग्राम खात्यावर तिला छायाचित्र पाठवून हे छायाचित्र प्रसारमाध्यमांवर न पसरविण्यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. पोलीसांनी या प्रकरणी भादंवि कलम ३५४ (ड), ५०६, सह पोक्सो कायदा १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel case registered against minor for sending fake obscene photo to a girl on instagram css