पनवेल: कामोठे येथील पोस्ट कार्यालयाबाहेर मागणी केल्यानंतर सुद्धा दोन वर्षांपासून तात्पुरत्या स्वरुपात उन्हाच्या झळा लागू नये म्हणून छप्पर (शेड) उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र सरकारी काम आणि बारा महिने थांब या उक्तीप्रमाणे पोस्ट विभागाचा कारभार सूरु असल्याने नागरिकांची मागणी बासनात पडून होती. अखेर यंदाच्या उन्हाळ्यातही नागरिक पोस्टाबाहेर रांगा लावून त्यांची कामे करत असल्याने दोन व्यक्तींनी पुढाकार घेऊन पोस्ट कार्यालयाबाहेर छप्पर उभारल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पनवेल : बैलगाडा शर्यतीमध्ये बैलाच्या ठोकरीत एक जखमी

मागील दोन वर्षांपासून कामोठे सीटीझन युनिटी फोरमच्या रंजना सडोलीकर या पोस्ट कार्यालयाबाहेर छप्पर उभारण्यासाठी पाठपुरावा करत आहे. सडोलीकर यांनी पनवेल पालिकेचे याबाबत लक्ष वेधल्यानंतर पालिकेने पोस्टाला त्यासंदर्भात कार्यवाही करण्याची शिफारस केली. परंतू काही वर्षांनी पोस्ट कार्यालय इतर जागेवर स्थलांतरीत केले जाईल असे कारण पोस्ट विभागाकडून नागरिकांना दिले जात होते. नागरिकांची होणारी गैरसोय ध्यानात घेऊन कामोठेवसाहतीमधील रवी बहोत आणि सागर पाटील या जागरुक नागरिकांनी पुढाकार घेऊन पोस्ट कार्यालयाबाहेर छप्पर (शेड) उभारून दिले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel citizens demand shade for shadow at post office of kamothe area css