पनवेल: सिडको वसाहतींमध्ये घर खरेदी केलेले घरमालक सध्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे पुरसदृष्यस्थितीला सामोरे करत आहेत. त्याचसोबत या घरमालकांना बुधवार सकाळपासून ते गुरुवार सकाळपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. सिडको मंडळाने कळंबोली, काळुंद्रे, करंजाडे आणि नवीन पनवेल या वसाहतींमध्ये पाणी पुरवठा बुधवार ते गुरुवारपर्यंत बंद राहणार असून नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : १२१ मीलीमीटर पावसात कळंबोली पाण्याखाली गेलीच कशी, पनवेल महापालिकेच्या बैठकीच चर्चा

महाराष्ट्र जिवन प्राधिकऱणाकडून (मजीप्र) सिडको मंडळाला पाणी मिळाल्यानंतर सिडको वसाहतींना पाणी पुरवठा केला जातो. सिडको मंडळाने संकेतस्थळावरुन नागरिकांना केलेल्या आवाहनामध्ये भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे तसेच वायाळ येथील दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणी पुरवठा होणार नसून गुरुवारी कमी दाबाने पाणी पुरवठा सूरु झाल्यानंतर शुक्रवारी (ता.१२) पाणी पुरवठा पुर्ववत होण्यासाठी लागू शकेल असे सुद्धा घोषणापत्रात कळविले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel during rainy season no water supply to cidco residents on wednesday and thursday css