पनवेल: पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेच्या पॅनलवरील अभियंत्यांनी सुरक्षित फलकाचा अहवाल दिला होता. परंतू तीन दिवसांपूर्वी हाच फलक खारघर येथील सेक्टर ३४ मध्ये अमनदूत मेट्रो स्थानकासमोर कोसळला. सुदैवाने यात जिवितहाणी झाली नाही. परंतू एक वाहन आणि बैलगाडीचे नूकसान झाले. या घटनेमुळे पनवेलमध्ये उभ्या असलेल्या इतर फलकांच्या सूरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. पनवेल महापालिका आयुक्तांनी या घटनेनंतर पालिका क्षेत्रातील सर्वच फलकांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोनक अॅड एजन्सी या कंपनीला पनवेल महापालिकेने पालिका क्षेत्रात फलक उभारुन त्यामधून व्यवसाय करण्याचा ठेका दिला आहे. महापालिकेला यामधून महसूली उत्पन्न मिळते. परंतू महापालिका क्षेत्रातील हे फलक जिवघेणे ठरतात का अशी चर्चा नागरिकांमध्ये सूरु आहेत. खारघर सेक्टर ३४ येथे रस्त्यालगत लावलेला एक भव्य फलक सोमवारी खाली कोसळला. काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथे भव्य फलक कोसळून मोठी जिवितहानी झाली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने पालिका क्षेत्रातील सर्व परवाने दिलेल्या फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नंतर परवाने दिले जातील अशी घोषणा केली. हे ऑडीट मुंबईचे आयआयटी संस्थेकडून करण्याचा मानस महापालिका प्रशासकांनी व्यक्त केला होता.  त्यानंतर महापालिकेच्या पॅनलवर असणाऱ्या अभियंत्यांकडून हे ऑडीट करण्याचे ठरले. पालिकेच्या पॅनलवर असणा-या स्ट्र्क्चरल ऑडीटर शिवाजी सरोदे या अभियंत्यांनी खारघर येथे कोसळलेल्या फलकाच्या सूरक्षेबाबत ऑडीट केले होते. हा फलक सुरक्षित असल्याचा अहवाल अभियंते सरोदे यांनी पालिकेला १५ जूनला सुपुर्द केल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली. परंतू सुरक्षित असणारा फलक पंधरा दिवसात कोसळला कसा असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जात आहे. स्ट्रक्चरल ऑडीट करणारा अभियंता सरोदे यांनी नेमकी कोणती तपासणी केली याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : नवी मुंबई : शहरी भागातील रहिवाशांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज द्या- शिवसेना (उ.बा.ठा )

या घटनेनंतर पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिका क्षेत्रातील सर्वच फलकांचे पुन्हा स्टक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयुक्त चितळे यांनी शहरातील सर्व फलकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले पालिका उचलत असल्याचे म्हटले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel hoarding collapsed which was declared safe in a report fifteen days ago css