पनवेल: सूकापूर येथील माळेवाडी या परिसरातील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र सोमवारी दुपारी साडेचार वाजता दुचाकीवरील चोरट्यांने खेचून चोरटा पसार झाला. या घटनेमुळे रस्त्यावर पायी चालणाऱ्या महिलांच्या सूरक्षेचा प्रश्न ऐॉरणीवर आला आहे.
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सोमवारी घडला. याबाबत रितसर पिडीत महिलेने पोलीसांकडे तक्रार नोंदविली. कार्तिक्य अपार्टमेन्टमध्ये राहणाऱ्या ३४ वर्षीय महिला दुपारी साडेचार वाजता सोसायटीच्या प्रवेशव्दारावर पायी चालत असताना ३० ते ३५ वर्षांचा चोरटा दुचाकीवरुन आला. त्याने या पिडीत महिलेसमोर दुचाकी आडवी लावून पिडीतेच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून तेथून धूम ठोकली.
हेही वाचा : मोरा मुंबई जलसेवा अनिश्चित काळासाठी बंद, हवामान विभागाचा धोक्याच्या इशारा
कोणतीही अनुचित प्रकार घडल्याशिवाय जोपर्यंत पोलीसांना रहिवाशी बोलवत नाहीत तोपर्यंत खांदेश्वर पोलीस या परिसरात फीरकत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. खांंदेश्वर पोलीसांनी या परिसरात चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गस्त घालणे गरजेचे असल्याची माहिती रहिवाशांकडून होत आहे.