पनवेल: महिलेवर बलात्कार, पिडीतेवर सासरकरांकडून छळ, बालिकेचे अपहरण असे महिलांवरील अत्याचाराचे विविध गुन्हे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात नोंद झाले आहेत. महिलांसाठी सूरक्षित अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्यात सध्या महिलांच्या सूरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील दोन आठवड्यात दोन घटनांमध्ये बालिकांचे लैंगिक शोषण करण्याच्या घटना उघडकीस आल्या. यातील पहिल्या घटनेत शाळेच्या शिक्षिकेकडे बालिकेने सावत्र बापाकडून अत्याचार होत असल्याचे सांगितल्यावर घटनेला वाचा फुटली. तर दूस-या घटनेत खिडुकपाडा गावात काकाने पुतणीवर बालवयापासून अत्याचार केला मात्र विवाह पश्चातही त्याने तीचे लग्न तुटावे म्हणून तीच्या पतीला तीचे अश्लिल छायाचित्र पाठवून तीचे लग्न मोडण्यास भाग पाडले. सध्या नराधम काका पोलीस कोठडीत आहे.

हेही वाचा : बीड लोकसभा निवडणूकीचा प्रचार नवी मुंबईत

मंगळवारी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला नोंदविण्यात आलेल्या घटनेमध्ये जासई गावात राहणा-या ३५ वर्षीय महिलेला मध्यप्रदेश येथे राहणा-या २६ वर्षीय अजित श्रीवास्तव याने पनवेल रेल्वेस्थानकाजवळ बोलावून सोने परत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याची घटना नोंदविण्यात आली आहे. मंगळवारी नोंदविलेल्या दूस-या घटनेत पनवेल शहरातील कच्छी मोहल्ला येथील सूफा मशीदीजवळ राहणा-या अनस शेख व त्यांच्या कुटूंबियांनी २५ वर्षीय महिलेचा छळ केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. छळासोबत पतीकडून अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे. मंगळवारच्या तीस-या घटनेत कळंबोली येथील रोडपाली परिसरातील सिंगल ढाब्यावरुन ११ वर्षांच्या बालिकेचे पहाटे अपहरण झाल्याची नोंद बालिकेच्या आईने पोलीस ठाण्यात केली आहे. 

हेही वाचा : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात दि. बा. पाटील यांच्या नावाची चर्चा

मागील वर्षी नवी मुंबई परिसरात महिलांविषयक ७०३ गुन्हे विविध पोलीस पोलीस ठाण्यात नोंदविले गेली. यातील ६८९ गुन्हे नवी मुंबई पोलीसांनी उघडकीस आणले. ९८ टक्के एवढा गुन्हे उघडकीस असण्याची गती आहे. मागील वर्षी १०३३ महिला बेपत्ता झाल्या होत्या त्यापैकी स्वत:हून परत आलेल्या आणि पोलीसांनी शोधून काढलेल्या अशांची संख्या ८०० असली तरी बेपत्ता महिलांना शोधून काढण्यासाठीच्या शोधमोहीमेला गती मिळालेली नाही. महिलांवरील छळ, अपहरण, विनयभंग या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सोशल इंजिनियरींगचे प्रयोग कमी झाल्याचे दिसत आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी महिला सहाय्य कक्षाला चालना देऊन नेरुळ येथे अद्ययावत महिलांच्या समुपदेशनासाठी सावली केंद्र सूरु केले.