पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात आणखी आठ दिवस २० टक्के पाणीकपात सुरू राहणार असल्याने सिडको मंडळाने या दरम्यान रहिवाशांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी १०० रुपये दराने एक टॅँकर पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. करंजाडे वसाहतीमध्ये पाणीकपात सुरू करण्याच्या आधीपासून अनेक दिवस टंचाईचा सामना रहिवाशी करत आहेत. नागरिकांमध्ये सिडको मंडळ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याच्या कारभाराविरोधात असंतोष आहे. त्यामुळे सिडको मंडळाने पाणीपुरवठा टँकरने करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची २७ तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक झळ सिडको वसाहतीमधील नागरिकांना बसणार आहे.

करंजाडे येथील नागरिकांनी एका सोसायटीत दिवसाला चार टँकर पाणी लागत असून एका टँकरसाठी दोन हजार रुपये मोजावे लागत असल्याने रहिवासी वैतागले आहेत. त्यामुळे सिडको मंडळाने एक टँकर पाणी (१० हजार लिटर) शंभर रुपयांमध्ये संबंधित गृहनिर्माण संस्थेला पोहोच करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली. तसेच टँकरसाठी लागणारी शंभर रुपये रक्कम कोणत्याही कर्मचाºयाच्या हाती न देता संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या पाणीपुरवठ्याच्या देयकामध्ये त्याचा समावेश केला जाईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे; परंतु पाणीकपात सुरू असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे सिडकोच्या पाणीपुरवठ्याने आवाहन केले आहे.

12 colleges in state offering acupuncture treatment for first time
राज्यात प्रथमच ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीची १२ महाविद्यालये
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Grape
राज्यात ५० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड ? जाणून घ्या, नोटबंदी, कोरोना टाळेबंदी, नैसर्गिक आपत्तींचा परिणाम
CIDCO considers extending lottery process for 26 000 houses under My Favorite CIDCO House scheme
२६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट

हेही वाचा : नवी मुंबई : २६ नोव्हेंबरला होणाऱ्या मॅरेथाॅन मार्गात बदल

आज आसूडगाव, खांदा कॉलनी येथे पाणीकपात

शनिवारी आसूडगाव, खांदा कॉलनी, त्यानंतर रविवारी नवीन पनवेल पूर्व बाजूकडील, त्यानंतर सोमवारी पनवेल पालिका आणि पोदी येथे पाणीकपात केली जाणार आहे. या कालावधीत या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाई भासू नये यासाठी सिडको मंडळाने संबंधित वसाहतींच्या पाणीपुरवठा कार्यालयाकडे रहिवाशांनी तक्रार केल्यावर तेथील पाणीपुरवठा अभियांत्रिकी विभागातील अभियंते खरोखरच टंचाई आहे का याची चाचपणी केल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा संबंधित गृहनिर्माण संस्थेला केला जाणार आहे.

Story img Loader