पनवेल : कामोठे येथे दोन दिवसांपूर्वी पारनेरवासियांच्या संवाद सभेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी एका ध्वनीफीतीव्दारे अहमदनगर जिल्ह्यात व पारनेर तालुक्यात प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके यांचे नाव न घेता लंके यांची दहशत असल्याचा आरोप केला होता. या वादग्रस्त ध्वनीफीतीमध्ये शिविगाळ आणि गोळ्या झाडण्याची धमकी डॉ. सुजय यांना देण्यात आल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले होते. या कथीत वादग्रस्त ध्वनीफीतीबद्दल महाविकास आघाडीचे डॉ. सुजय यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके यांनी मंगळवारी लोकसत्ताकडे दिलेल्या प्रतिक्रीयामध्ये कथीत ध्वनीफीत बनावट असून ज्या दोन व्यक्तींचे हे संभाषण आहे त्यांनी हा आवाज त्यांचा नसल्याचे म्हटले आहे. तसेच पाच वर्षे खासदारकी असताना विकासकामे न केल्याने एेन निवडणूकीत कोणताही मुद्दा हाती राहीला नसल्याने प्रचारासाठी विरोधकांनी रचलेले षडयंत्र असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र मुंबईस्थित पारनेरवासी सूज्ञ असून ते यावर योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रीया लंके यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा