पनवेल : खारघर रेल्वेस्थानक ते वसाहत या पल्यावर धावणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम सेवेच्या (एनएमएमटी) बसला बुधवारी दुपारी वसाहतीमधील सेक्टर 15 येथील रस्त्यावर अचानक आग लागली. एनएमएमटीच्या बसचालकाला पावणेबारा वाजता इंजीनमधून धूर येत असल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने बस रस्त्याशेजारी लावून पहिल्यांदा प्रवाशांना बसमधून उतरवले. काही मिनिटांत बसमध्ये आगीने पेट घेतला. अग्निशमन दलाचे बंब आणि जवान येईपर्यंत भिषण आग या परिसरात लागली.
हेही वाचा : सागरी सुरक्षेसाठी महत्वपूर्ण अशा मोरा पोलीस ठाण्याच्या इमारतीला निधी मिळेना; पाच वर्षांपासून इमारत अपूर्णच
घरकुल व स्पॅगेटी या सिडको मंडळाने बांधलेल्या वसाहतींमधील रहिवासी याच रस्त्याने रेल्वेस्थानकाकडे ये-जा करतात. हा रस्ता काही मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आला. काही क्षणात आगीने बसला भस्मसात केले. तोपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही दुर्घटना झाली नाही. यापूर्वी सुद्धा तळोजा येथे प्रवासी बसला आग लागली होती. एनएमएमटीच्या बस जुन्या झाल्याने अनेक बसचालक नादुरुस्त आहेत. अशा नादुरुस्त बस रस्त्यावर धावतात त्यामुळे प्रवासी फेरीसाठी बसचालक ही तयार नसतात.