पनवेल: पनवेलमधील नागरिकांना पावसाळ्यातच पुढील चार दिवसांचे पाण्याचे नियोजन गुरुवारपासून करावे लागणार आहे. पनवेलला पाणी पुरवठा करणा-या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (म.जी.प्र.) याबाबतची सूचना नोटीस पनवेल महापालिका, सिडको मंडळ, विविध ग्रामपंचायतींना दिली आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार म.जी.प्र.ने भोकरपाडा पंपस्टेशनमधील आाणि जलवाहिनीवरील दूरुस्तीचे कामे हाती घेतल्यामुळे २४ तास हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी पाणी पुरवठा सूरु झाल्यानंतर शनिवार व रविवारपर्यंत पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पनवेल शहरासह विविध सिडको वसाहतींमधील आणि गावांमधील नागरिकांनी पुढील पाच दिवस पिण्याच्या पाण्यासाठी साठवणूक करावी, तसेच पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन म.जी.प्र.च्या अधिका-यांनी केले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : बेलापूरात शिंदे-फडवणीसांना ‘बहिणी’ची साद; मंदा म्हात्रे ‘लाडक्या’ ठरतील का याचीच चर्चा अधिक

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता आर. टी. वायदंडे यांनी दिलेल्या सूचनापत्रामध्ये विद्युत व स्थापत्य विभागाची दुरुस्ती न्हावाशेवा पाणी पुरवठा केंद्रामधून होणा-या जलवाहिनी व इतर कामे हाती घेतली जाणार असल्याने हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये भोकरपाडा पंपींग स्टेशनमधील पंप क्रमांक तीनच्या ठिकाणी नवीन बसविण्यात आलेल्या ८८५ अश्वशक्ती पंपाचा डिलेव्हरी पाईप पंपला जोडणे, तसेच या पंपींग स्टेशनमधील जुना पंप क्र.४ चे संपवेलमध्ये पडलेला पंप (बाउल असेम्ब्ली व कॉलम पाईप असेम्ब्ली) काढुन घेणे. पंपीग स्टेशन मधील जुना ब्रेकर पॅनेल नादुरुस्त झाल्याने त्याठिकाणी नविन बसविण्यात आलेला पॅनेल चार्ज करुन वीजवाहिनी जोडुन चालु करून घेणे. वायाळ पंपीग स्टेशनमध्ये नविन ८८५ अश्वशक्ती पंपाचे बेरिंग नवीन बसविणे. भोकरपाडा अस्तित्वातील जलशुध्दीकरण केंद्रातील शटडाऊन अनुषंगाने असलेली इतर कामे करणे. भोकरपाडा येथे एक जुना एच. टी. ट्रान्सफॉर्मर काढून त्या ठिकाणी नवीन  २२/३.३ केव्हीचा एच. टी ट्रान्सफॉर्मर बसविणे व त्याची रंगीत तालिम घेणे, वायाळ केटी वेअर येथे गेट बसविणे. वायाळ ते भोकरपाडा उर्ध्ववाहिनीवरील गळत्या दुरुस्ती करणे. जलशुध्दीकरण केंद्रातील नियमित दुरुस्तीची कामे. १३२० मिलीमीटर व्यासाच्या गुरुत्व वाहिनीवरील कळंबोली स्टील मार्केट, पनवेल रेल्वे कॉलनी, पनवेल रेल्वे स्टेशन, पोदी कनेक्शन जवळ, शांतीवन, नॅशनल हार्मोनी जवळ, ठोंबरेवाडी व समतानगर येथील गळत्या दुरुस्तीची कामे मजीप्रचे कर्मचारी कऱणार आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel no water supply for next 24 hours css