पनवेल: यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील सोमवारी मध्यरात्री पावणेएक वाजता वारक-यांची बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये आतापर्यंत पाचजणांचे प्राण गेले असून सहा रुग्ण अजूनही कामोठे येथील महात्मा गांधी मीशन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अत्यावस्थेत तर इतर रुग्णांवर उपचार सूरु आहेत. सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात ज्या ट्रॅक्टरमुळे हा अपघात घडला तो ट्रॅक्टर अपघातापूर्वी द्रुतगती महामार्गावरील मधल्या रांगेत उभा असल्याची धक्कादायक माहिती बसचालक संजय पाटील यांनी दिलेल्या जबाबात उघड झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर द्रुतगती महामार्गावर उभा राहीलाच का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

हेही वाचा : उरण: आगमनालाच बोंबिलाचा भाव कडाडून दोनशे रुपयांवर! पावसाळी मासेमारी बंदीमुळे मासळीचे दर वधारून खिशावर भार

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामधील पाच मृतांपैकी ट्रॅक्टर चालक व त्याच्या सहका-याची ओळख तब्बल १० तासांनी झाली. या अपघातामध्ये ट्रॅक्टरचालक २७ वर्षीय तरेवाज सलाउद्दीन अहमद (रा. उत्तरप्रदेश, मधुबन) तसेच त्याचा सहकारी ३० वर्षीय दीपक सोहन राजभर (रा. उत्तरप्रदेश, महू) यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. ५४ प्रवाशांची बस ट्रॅक्टरला ठोकरुन द्रुतगती महामार्गावरील खोल खड्ड्यात गेल्याने बसमधील तीन जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. पोलीस उपायुक्त पानसरे यांच्या नेतृत्वाखाली या अपघाताची चौकशी सूरु असून सकाळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती फोनवरुन घेतली. पोलीस तपासामध्ये संबंधित ट्रॅक्टर चुकीच्या मार्गाने जात असल्याचे समजल्याने ट्रॅक्टर उजव्या बाजूला वळण घेत असताना हा अपघात झाल्याचा संशय पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व्यक्त केला आहे. नेमका अपघात झाला कसा याची चौकशी पोलीस करीत असून तीन पोलीस उपनिरिक्षक व कर्मचारी बसचालक, बसमधील प्रवासी, बसचा प्रवास सूरु झाल्यापासूनचा सीसीटिव्ही कॅमेरातील छायाचित्र, ट्रॅक्टरचा मालक यांच्याकडे चौकशी करत आहेत.