पनवेल : पनवेल शहरातील नित्यानंद मार्गालगत पावसाळी गटाराचे काम सुरू असताना सुरक्षेची खबरदारी न घेतल्याने एका औषधविक्रेत्या दुकानदार महिलेच्या हाताचे हाड मोडले आहे. यापूर्वीही दुकानात काम सुरू असताना दगड व माती येत असल्याची तक्रार केल्यानंतरसुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे अखेर पीडित महिलेने पोलिसांत ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला.

सध्या शहरातील नित्यानंद मार्गालगत गटाराचे काम करण्याचा ठेका पनवेल महापालिकेने ठेकेदाराला दिला आहे. रस्त्यालगतच्या गटाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराने व त्याच्याकडील काम करणारे जेसीबी चालक व अन्य कामगारांनी केलेल्या दुर्लक्षाचा फटका रस्त्यालगतच्या सामान्य दुकानदारांना सहन करावा लागत आहे.

nashik case filed against three individuals for causing accident by transporting iron bars
नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत
Aatkoli dumping ground Thane corporation FIR registered
ठाणे पालिकेच्या आतकोली कचराभुमीवर दगडांसह पाण्याची चोरी, पालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त
worker dies after falling from terrace case registered against contractor for negligence
गच्चीवरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड

हेही वाचा : VIDEO : कोणावर विसंबून राहू नका, स्वतःच सक्षम बना; तरुणीवर हल्ला, लोकांनी घेतली फक्त बघ्याची भूमिका

नित्यानंद मार्गावरील दुर्घटनेमध्ये औषधाचे दुकान चालविणाऱ्या व पेशाने वकिली करणाऱ्या महिलेच्या हाताचे हाड मोडले आहे. या घटनेतील पीडिता रेश्मा माळी या जखमी आहेत. माळी यांचे औषधाचे दुकान सहस्राबुद्धे रुग्णालयासमोर आहे. सकाळी दुकान उघडून साफसफाई करत असताना दुकाना समोरील रस्त्यावर गटाराचे महापालिकेचे जेसीबीच्या साह्याने काम सुरू असताना मोठा दगड अचानक उडून येऊन माळी यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर लागला.

हेही वाचा : उरण : समुद्राच्या ओहोटीमुळे मोरा – मुंबई जलप्रवासात खंड, काही तासांसाठी प्रवास ठप्प होणार

अकरा महिने काम सुरू राहणार

पनवेल महापालिका नित्यानंद मार्गाची रुंदी वाढवण्याचे काम सुरू आहे. ११०० मीटर लांबीचे गटार बांधणे, दुभाजकासह इतर कामांसाठी पालिका साडेआठ ते नऊ कोटी रुपये खर्च करणार आहे. हे काम सुरू होऊन दीड महिना झाला असून आणखी ११ महिने हे काम शहरात सुरू राहणार आहे. अनेक मालमत्ताधारकांची घरे गटाराशेजारी असल्याने प्रत्येकाशी वाटाघाटी करण्यासाठी बांधकामाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. हे काम जैन कन्सट्रक्शन या ठेकेदार कंपनीला महापालिकेने दिले आहे.

Story img Loader