पनवेल : कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारात शिवसेनेचे नेते महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले होते. या घटनेमुळे राहुल पाटील हा तरुण राज्यभरात चर्चेत आला. गुरुवारी राहुल पाटील याच्यासह एका टोळक्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैलगाडा शर्यतीमध्ये भांडण करुन तेथे गोळीबार प्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे. १२ मार्चला पनवेल तालुक्यातील डुंगी नदीच्या काठावरील मोकळ्या जागेत शक्ती गायकवाड यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या शर्यतीमध्ये राहुल व जयेश पाटील यांच्या बैलाचा सामना झाला. या स्पर्धेत राहुलचा बैल हरला. जयेशच्या समर्थकांनी गुलालची उधळण करुन छायाचित्र काढत असताना जल्लोष साजरा केला. या जल्लोषाचा राग मनात धरुन राहुल व त्याच्या समर्थक टोळक्याने जयेश पाटील व त्यांच्या गटातील समर्थकांकडे पाहून अश्लील हावभाव करुन आरडाओरडा सुरू करत दगडफेक केली.

राहुल याच्या टोळक्यातील एकाने गोळीबार केल्याचे पोलीसांना समजले. या घटनेबाबत मागील दोन दिवसांपासून मौन पाळण्यात आले होते. परंतु, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यापर्यंत संबधित घटनेचे छायाचित्र आणि व्हीडीओ पोहचल्यावर गुरुवारी याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पनवेल शहर पोलीसांना देण्यात आले. राहुल याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलीसांवर सुद्धा राजकीय दबाव टाकण्यात आला होता. तरीही पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी राहुल व त्याच्या टोळक्यातील १५ ते २० तरुणांवर भादवि. कलम ३३६, २९४, १४१, १४३, १४७, १४८, १४९ सह शस्त्र कायदा १९५९ चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. लवकरच या प्रकऱणी पोलिसांचे पथक राहुल याला अटक करणार आहेत.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Malegaon blast case Sadhvi Pragya Singh Absence despite bailable warrant
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती
case has been registered against city president of Sharad Pawar NCP in case of assault
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शहराध्यक्षावर मारहाण प्रकरणी गुन्हा
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा : सातबारावरील ‘३२ ग’चा भोगवटादार वर्ग २ चा १ करण्यासाठी पनवेलमध्ये एकरी ९० हजारांचा भाव

कोण आहे राहुल पाटील ?

कल्याणमधील आडिवली गावातील मूळ रहिवाशी असणारा राहुल पाटील हा तरुण त्याच्याकडील मथूर या शर्यतीच्या बैलामुळे चर्चेत आला. मथूर हा बैल शक्यतो शर्यत हरला नसल्याने बैलगाडा शर्यतीच्या प्रेक्षकांचा हा आवडता बैल आहे. कल्याण तालुक्यासारखीच पनवेलमध्ये सुद्धा बैलगाडा शर्यतीमधील बैलांचा सांभाळ करणे आणि त्या बैलांना शर्यतीमध्ये उतरवणे यासाठी अनेक शेठजी स्वत:ची दौलतजादा करतात. यापूर्वी पनवेलमधील पंढरीनाथ फडके व राहुल पाटील यांच्यामध्ये याच बैलगाडा शर्यतीमध्ये झालेल्या संघर्षामुळे कल्याणमध्ये गोळीबार झाला होता. त्यावेळी राहुल पाटील हा चर्चेत राहीला. आ. गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेत राहुल हा महेश गायकवाड याच्यासोबत त्याच पोलीस ठाण्यात उपस्थित होता. त्यालाही किरकोळ जखमा झाल्या होत्या. राहुल याचा समाजमाध्यमांवर मुख्यमंत्री पूत्र खा. श्रीकांत शिंदे यांचा समर्थक असल्याचे अनेक व्हीडीओ झळकत आहेत.