पनवेल : कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारात शिवसेनेचे नेते महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले होते. या घटनेमुळे राहुल पाटील हा तरुण राज्यभरात चर्चेत आला. गुरुवारी राहुल पाटील याच्यासह एका टोळक्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैलगाडा शर्यतीमध्ये भांडण करुन तेथे गोळीबार प्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे. १२ मार्चला पनवेल तालुक्यातील डुंगी नदीच्या काठावरील मोकळ्या जागेत शक्ती गायकवाड यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या शर्यतीमध्ये राहुल व जयेश पाटील यांच्या बैलाचा सामना झाला. या स्पर्धेत राहुलचा बैल हरला. जयेशच्या समर्थकांनी गुलालची उधळण करुन छायाचित्र काढत असताना जल्लोष साजरा केला. या जल्लोषाचा राग मनात धरुन राहुल व त्याच्या समर्थक टोळक्याने जयेश पाटील व त्यांच्या गटातील समर्थकांकडे पाहून अश्लील हावभाव करुन आरडाओरडा सुरू करत दगडफेक केली.
पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीमधील गोळीबार प्रकरणी राहुल पाटीलवर गुन्हा दाखल
कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारात शिवसेनेचे नेते महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले होते.
Written by लोकसत्ता टीम
पनवेल
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-03-2024 at 14:21 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel rahul patil booked for firing at bullock cart race event css