पनवेल : तालुक्यातील कोन गावालगत इंडीया बूल्स या इमारत बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या महागृहनिर्माण प्रकल्पातील रहिवाशांनी रविवारी पिण्याचे पाणी अपुरे मिळत असल्याने दिवसाला पन्नासहून अधिक टँकर पाणी खरेदी करावे लागत असल्यामुळे इमारतीच्या आवारात आंदोलन केले. येथील रहिवाशांनी विकासक कंपनीविरोधात घोषणाबाजी करुन विकासकाने आश्वासन देऊनही त्याचे पालन न केल्यामुळे क्लबहाऊस, स्विमींगपुल यांसारख्या इतर सुविधा न दिल्याचा आरोप केला. रहिवाशांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रीया देताना इंडीया बूल्स कंपनीच्या सोसायटीच्या आवाराची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडीया बूल्सचा हा महागृहनिर्माण प्रकल्प असून यामध्ये ३२०० सदनिका आहेत. ३२ मजल्यांच्या सतरा इमारतींमध्ये हे रहिवाशी राहतात. २०१८ सालापासून अनेक रहिवाशी येथे राहण्यासाठी आले आहेत. काही वर्षांपूर्वी इमारतीच्या रहिवाशांनी सोसायटी स्थापन केली मात्र अनेक सुविधा प्रलंबित स्तरावर असताना सोसायटी हस्तांतरण प्रक्रीया विकसकाने पार पाडल्याचा आरोप रहिवाशांनी स्थापन केलेल्या संघर्ष समितीचे प्रतिनिधी राहुल सोनावणे यांनी केला. पिण्याचे पाणी कमी येत असल्याने आणि इंडीया बूल्स कंपनीकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर रहिवाशांनी माहितीच्या अधिकारामध्ये नेमके पिण्याचे पाणी सोसायटीला किती मिळते याची माहिती काढली.

हेही वाचा : जासई ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देताच सिडकोने चर्चेला बोलवलं, सोमवारी सिडको भवनात होणार चर्चा, साडेबारा भूखंडाचे निर्माते दिबांचे गावच योजनेविना

या माहितीमध्ये इंडीया बूल्स कंपनीशी निगडीत असलेल्या एका दूसऱ्या कंपनीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात जलजोडणी दिल्याचे स्पष्ट झाले. विकासक कंपनीच्यावतीने सोसायटीच्या नावाने जलजोडणी कधी नोंदणी केली जाईल याचे ठोस उत्तर विकासक इंडीयाबूल्स कंपनीने दिले नसल्याचे येथे राहणाऱ्या दिनेश सोनावणे यांनी सांगीतले. तसेच संबंधित जलजोडणी ही म्हाडा प्रकल्पातील घरे बांधण्यासाठी घेतली असून यातून या प्रकल्पाला पिण्याचे पाणी मिळत असून भविष्यात ही पाणी सुविधा बंद झाल्यास रहिवाशांनी काय करावे? या चिंतेत येथील रहिवाशी आहेत.  याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रकाश देशमुख या जेष्ठ नागरिकांनी नाव मोठे लक्षण खोटे असा उल्लेख या विकासक कंपनीच्या कारभाराविषयी केला आहे.

हेही वाचा : Video : नवी मुंबई पोलिसांची बेफिकरी आणि चपळता, दोन्हींचे उदाहरण एकाच वेळी….बघा नक्की काय घडलं

सेवानिवृत्तीनंतर आयुष्याचा शेवटचा काळ शांततेत आणि सर्व सुविधायुक्त वसाहतीमध्ये जाईल यासाठी इंडीया बूल्स या महागृहनिर्माण प्रकल्पात घर खरेदी केले. महाग असले तरी सुविधा असल्याने घर खरेदी केले मात्र काही काळ सूरु असलेली सुविधा सध्या बंद करण्यात आल्याने ही रहिवाशांची फसवणूक असल्याचे मत प्रकाश देशमुख यांनी व्यक्त केले. संघर्ष समितीचे राहूल सोनावणे यांनी सध्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रति टँकर ३६०० रुपये देऊन खरेदी करत असल्याने येथे राहणाऱ्या महिलांसह सर्वच वैतागले असल्याचे सांगितले. लहान मुलांनी विकासक कंपनीने लवकरच इनडोअर गेमसाठी क्लबहाऊस तसेच स्विमिंग पुल सूरु करण्याची विनंती केली. येथील सुविधा बंद असल्याने पनवेलपर्यंत बालकांना घेऊन जावे लागत असल्याचे रहिवाशांनी सांगीतले. 

हेही वाचा : उरण : पावसाळा सरला आणि रस्त्यांवर धुरळा पसरला; प्रवाशांना खड्डे आणि धुरळा यांचा करावा लागतोय सामना

याबाबत इंडीया बूल्स कंपनीचे कोन येथील महागृहनिर्माण प्रकल्पात सुविधा देण्यासाठी विकासक कंपनीने नेमलेले व्यवस्थापक इरफान टोलू यांनी सांगीतले, की कंपनी आणि रहिवाशांमध्ये संवाद सूरु आहे. या प्रकल्पात राहणाऱ्या अनेक सदनिकाधारकांनी इंडीयाबूल्स कंपनीची थकीत रक्कम ठेवल्याने सुविधा देण्यास अडचणी येत आहे. ही रक्कम सूमारे २३ कोटी रुपये आहे. तरीही येथील रहिवाशांना कोणतीही अडचण होणार नाही यासाठी इंडीया बूल्सच्यावतीने आम्ही सदैव काम करत असतो. पिण्याचे मूबलक पाणी इमारतींमधील रहिवाशांना दिेले जाते. टँकरचे पाणी का खरेदी करावे लागते याची माहिती आमच्याकडे नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel residents of india bulls housing society agitation for not getting basic amenities like water from the developer css
Show comments