पनवेल: कोकण पदवीधर निवडणूकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना अद्याप शिवसेनेने (शिंदे गट) उमेदवार निश्चित केला नाही. शिवसेनेचे सचिव संजय मोरे हे इच्छुक असताना पनवेलमधील शिवसेनेच्या गटाने मंगेश रानवडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे शिवसेनेत ताळमेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण पदवीधर मतदारसंघात मागील निवडणूकीपेक्षा दुप्पटीने मतदारांची संख्या वाढली असून सध्या कोकण पदवीधर मतदारसंघात २ लाख ३ हजार मतदारांची नोंद झाली आहे.  रायगड जिल्ह्यात ५३ हजार मतदार असून यापैकी २० हजार मतदार पनवेलमधील आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यात ९५ हजार मतदार आहेत. यापूर्वीच्या निवडणूकीत निरंजन डावखरे यांना ३२ हजार पदवीधरांनी पसंदी दर्शविल्याने ते या मतदारसंघातून आमदार झाले. मात्र त्यावेळेस एक लाखावर मतदार संख्या होती. सध्या दुप्पटीपेक्षा जास्त मतदार या मतदारसंघात वाढले आहेत. मतदारांप्रमाणे इच्छुक उमेदवारांची संख्या मतदारसंघात मोठी झाली आहे. अद्याप या मतदारसंघात चौरंगी लढत होणार की दुरंगी की तिरंगी हे अद्याप ठरलेले नाही. ७ जून ही या निवडणूकीत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असली तरी शिवसेनेचा एबी फॉर्म संजय मोरे यांना मिळणार की पनवेलचे इच्छुक असलेल्या मंगेश रानवडे यांना मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा : पनवेल: अखंडीत वीज समस्येसाठी वीजग्राहक, महावितरण कंपनीच्या अधिका-यांची तळोजात बैठक

दोन आठवड्यांपूर्वी कळंबोली येथील सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मंगेश रानवडे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पनवेलचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असा ठराव झाला. मात्र त्यानंतर स्वता ठाणे जिल्ह्यातून मतदारांची संख्या अधिक असल्याने सेनेचे सचिव संजय मोरे यांनी इच्छा व्यक्त केल्याने पनवेलचा इच्छुकांचा दावा मागे घेतील असे चित्र होते. मात्र मंगेश रानवडे यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनूसार अद्याप कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी पक्षाने दिल्यास लढविण्यास इच्छुक असल्याचा दावा केल्याने शिवसेनेत असम्नवय असल्याचे चित्र आहे. मंगेश रानवडे यांचे शिक्षण बीटेक, एमबीए झाले आहे. 

हेही वाचा : नवी मुंबई : रस्त्यावर भिक्षा मागण्यासाठी हप्ता देण्यास नकार देणाऱ्या तृतीयपंथीयावर जीवघेणा हल्ला

संविधानाने पदवीधरांना त्यांची बाजू विधिमंडळात मांडता यावी यासाठी हे सदस्य निर्माण केले आहे. ही सर्वात चांगली बाजू आहे. पदवीधरांचे नेतृत्व करणारा खरा चेहरा विधिमंडळात गेल्यास त्याला काम करण्याची संधी मिळेल. पदवीधरांना नेहमी भेडसावणारा कोकणात जाणारा महामार्गाचा विषय, शालेय मुले, शालेय शुल्क, बदलणारी शिक्षण प्रणाली, आरोग्य, वाहतूक, प्रदूषण हे सर्व विषय पदवीधर मतदारसंघातील यापूर्वीच्या सदस्यांनी मांडलेले दिसत नसल्याने मला निवडणूकीत उमेदवार होण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही पनवेलचे पदाधिका-यांनी वरिष्ठांकडे ही शिफारस केली आहे. 

मंगेश रानवडे, उप महानगरप्रमुख, शिवसेना, पनवेल</cite>
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel shivsena shinde faction aspirants tussle in konkan graduate constituency css