पनवेल: सिडको महागृहनिर्माण प्रकल्पातील तळोजा वसाहतीमधील ७ हजारांहून अधिक लाभार्थींना रविवारी सेक्टर ३४ व ३६ येथील प्रकल्प ठिकाणी बैठकीत आक्रमक पवित्रा घेत ‘आधी सिडको महामंडळाने नुकसान भरपाई द्यावी, नंतरच आम्ही सदनिकांचा ताबा घेऊ’ अशी भूमिका घेतल्याने शेकडो लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न अपुर्ण राहण्याच्या वाटेवर आहे. मागील तीन वर्षांपासून सिडको मंडळाने या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या सदनिकेचा ताबा वेळीच न दिल्याने या लाभार्थ्यांना गृहकर्जाचे हफ्ते भरावे लागले आणि इतर राहण्याचे घरभाडे भरावे लागले. त्याचीच नुकसान भरपाई हे लाभार्थी मागत आहेत. तळोजातील अपु-या पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळे सिडको महागृहनिर्माण प्रकल्पातील नवीन सदनिकेत राहण्यासाठी रहिवाशी धास्तावले आहेत. चालण्यासाठी रस्ते, पथदिवे आणि मलनिसारण वाहिनीची कामे पुर्ण करा, त्यानंतरच सदनिकांचा ताबा द्या, अशी भूमिका या लाभार्थ्यांनी घेतली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा