पनवेल : आचारसंहितेपूर्वी १५ मार्चला राज्य सरकारने पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको हद्दीत हस्तांतरणीय विकास हक्काचा (टीडीआर) प्रश्न मार्गी लावल्याने विकासकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पालिका क्षेत्रातील सिडको हद्दीत नव्या टीडीआर धोरणाचा लाभ खासगी बांधकाम व्यावसायिकांसोबत जिर्ण इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार आहे. सिडको हद्दीत नियोजित शहर वसाहत असल्याने भूखंडाचे क्षेत्र तेवढेच राहणार असले तरी टीडीआर वापण्यासाठी पनवेल पालिकेला प्रिमीअम शुल्क भरुन हा टीडीआर खरेदी करुन उंच इमारती मार्फत विकास साधता येईल. याबाबतची अधिसूचना नगरविकास विभागाचे उपसचिव निर्मलकुमार चौधरी यांनी १५ मार्चला जाहीर केली असून सिडको हद्दीत टीडीआर लागू करण्याच्या शासनाच्या निर्णयाबद्दल हरकती व सूचना पुढील ३० दिवसांत नागरिकांना नोंदविता येणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in