पनवेल : सरकारने २२ वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बांधला परंतू अजूनही या महामार्गातील दोष सरकार दूर करु शकली नाही. सर्वाधिक पथकर याच महामार्गावरील वाहनचालकांकडून वसूल केला जात असला तरी वाहनचालक व प्रवाशांची सूरक्षा वा-यावर आहे. सोमवारी मध्यरात्री वारक-यांची बस व ट्रक्टरच्या भिषण अपघातामध्ये महामार्गावरील सीसीटिव्ही कॅमेरांमध्ये या अपघाताची दृष्ये कैद झाली का याविषयी पोलीस तपास करु लागले, मात्र हे सीसीटिव्ही कॅमेरा अद्यार कार्यान्वित न झाल्याने सरकारच्या कामांच्या प्राधान्यक्रमांविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच अनेक वर्षे नगरविकास व एमएसआरडीसी या विभागाचा पदभार असला तरी मुख्यमंत्री ही परिस्थिती बदलू शकली नाहीत.

९४.५ किलोमीटर अंतरावर तातडीने मुंबईहून पुण्याला जाता यावे यासाठी हा महामार्ग बांधण्यात आला. मागील २२ वर्षापासून शेकडो प्रवाशांचे या महामार्गात जिव गेले. प्रत्येक अपघातावेळी सरकारचे मंत्री द्रुतगती महामार्गालगत तातडीने जखमींना उपचार मिळावेत म्हणून ट्रामा सेंटर, वाहनांच्या गती नियंत्रणासाठी सीसीटिव्ही कॅमेरे, हॅलिपॅड याविषयी घोषणा करते. परंतू मंत्र्याच्या या घोषणा शेवटपर्यंत घोषणाच राहत आहेत. सर्वाधिक अपघात द्रुतगती महामार्गावर होत असल्याने मृत्यूचा मार्ग अशी ओळख या द्रुतगती महामार्गाला मिळाली. अपघातांवर नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या समितीने वाहनांच्या गती आणि अपघातावेळी देखरेखीसाठी एमएसआरडीसीने ९४.५ किलोमीटर अंतरावर ४०० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. हे कॅमेरा बसविण्याचे काम पुर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात यातील अनेक कॅमेरे बंद असल्याचे सोमवारच्या अपघातावेळी उजेडात आले.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

हेही वाचा : द्रुतगती महामार्गावरील अपघात कसा झाला? चुक कोणाची? नेमकं काय झालं?

कॅमेरांसोबत अवजड वाहने क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक द्रुतगती महामार्गावरुन करत असल्याने वजनकाटे महामार्गातील पथकर नाक्यांवर अनेक ठिकाणी बसविण्याचा प्रस्ताव कागदावरच राहीला. ट्रामासेंटरमधील अस्थिरोग तज्ज्ञ, न्युरोसर्जन, मनक्याचे तज्ज्ञ यांचा अभाव असल्याची बाब समोर आली. कळंबोली येथून हा द्रुतगती महामार्ग सूरु होतो. दुचाकी, ट्रक्टर, सायकल या वाहनांवर द्रुतगती महामार्गावर प्रतिबंध केले आहे. मात्र ही वाहने रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध केली नाही. सोमवारी ट्रक्टरचा चालक तरेवाज अहमद याने चुकून ट्रक्टर द्रुतगती महामार्गावर चढविल्याचे बोलले जात आहे. मात्र तरेवाजचा ट्रक्टर रोखणारी यंत्रणा द्रुतगती महामार्गावर नव्हती. द्रुतगती महामार्गावर सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित कधी होणार याची माहिती विचारण्यासाठी महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस निरिक्षक शेंडगे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी असल्याचे सांगीतले. काही दिवसांपूर्वीच पोलीस अधिकारी शेंडगे यांनी त्यांच्या पदाचा पदभार स्विकारला आहे.

Story img Loader