पनवेल: खारघरमध्ये राहणाऱ्या एका महिलेला शेअर बाजारात रक्कम लावल्यास अधिकचा नफा मिळेल, असे आमिष दाखवून तब्बल सव्वा चार कोटी रुपयांची फसवणूक ऑनलाईन पद्धतीने भामट्यांनी केली आहे. खारघरमधील केशर हार्मोनी या इमारतीमध्ये राहणाऱ्या सूचेता अरुण पौडवाल यांना भामट्यांनी शेअर बाजारात खरेदी विक्री केल्यास सर्वाधिक नफा मिळेल यासाठी भामट्यांनी संपर्क साधला.
हेही वाचा : आयफोन न दिल्याने मुलाची आत्महत्या
२८ एप्रिल ते ७ जुलै दरम्यान भामटे सूचेता यांच्या संपर्कात होते. सूचेता यांनी ४ कोटी ४० लाख २५ हजार एवढी रक्कम गुंतवली होती. त्यापैकी ५ लाख ९३ हजार ५५७ रुपये त्यांना परत मिळाले. उर्वरीत ४ कोटी ३४ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याने सूचेता यांनी पोलीस ठाणे गाठले. सूचेता यांना एॅडवेन्ट इंटरनॅशनल डी – ८७५ या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये भामट्यांनी सहभागी करुन घेतले होते. याबाबत नवी मुंबई पोलीसांचे सायबर सेलचे पोलीस पथक विशेष तपास करत आहे.