पनवेल: पतीने वारंवार केलेल्या छऴवणूकीमुळे खारघर वसाहतीमधील एका ३१ वर्षीय महिलेने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. याबाबत मृत महिलेच्या भावाने तक्रार दिल्यावर आठ दिवसांनी खारघर पोलीसांनी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा : दिशाभूल करणारा संदेश पाठविणाऱ्या विरोधात निवडणूक आयोगाची पोलिसांत तक्रार
खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ मधील इनोव्हेटीव्ह हाईट्स या इमारतीमध्ये ११०२ क्रमांकाच्या सदनिकेत अर्चना व आमोध सिंग हे दाम्पत्य राहत होते. ३ मे रोजी अर्चनाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्चना यांच्या भाऊ अमनकुमार याने शुक्रवारी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये माहेराहून हुंड्यासाठी छळ सूरु होता. तसेच अर्चना यांचा मानसिक व शारिरीक जाच सूरु असल्याने त्यांनी कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे भावाने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.