मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन आठवड्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. राज्यातील सर्वच बाजारात कांद्याच्या दरात घसरण होत आहे. सोमवारी एपीएमसी बाजारात प्रति किलो ८ ते १० रुपयांची घसरण झाली आहे. बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा कमी प्रमाणात येत असून हलक्या प्रतीचा कांदा अधिक येत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: खारघरमध्ये भाजपाचे बारबंद आंदोलन
दिवाळीनंतर कांद्याचे दर वधारतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार दर ही कडाडले होते . तीन आठवड्यापूर्वी घाऊक बाजारात कांद्याच्या दराने ३५ गाठली होती. त्यामुळे पुढील कालावधी कांद्याचे दर आणखीन वाधारण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यानंतर बाजारात अचानकपणे कांद्याचे दर गडगडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मागील आठवड्यात उच्चतम प्रतीचा कांदा प्रति किलो २२ ते २८ रुपयांवर होता तोच कांदा आता १५ ते २ रुपयांवर आलेला आहे. तर हलक्या प्रतीचा कांदा १० ते १२ रुपये प्रति किलोने विकला जात आहे. सोमवारी एपीएमसी बाजारात कांद्याच्या १०९ गाड्या दाखल झाले आहेत. त्यापैकी चार ते पाच गाड्या नवीन कांद्याची आवक असून उर्वरित जुना कांदा दाखल झाला आहे. मात्र या जुन्या कांद्यामध्ये उच्चतम प्रतीच्या कांद्याला अधिक मागणी आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: उरण चारफाट्यावरील अंधाराचा बळी; दुचाकीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
त्या कांद्याचा पुरवठा अत्यल्प आहे. किरकोळ ग्राहकांकडून उच्चतम प्रतीच्या कांद्याला अधिक मागणी असते. तर हॉटेल व्यवसायिकांकडून हलक्या प्रतीच्या कांद्याला पसंती दिली जाते. येत्या पंधरा दिवस कांद्याचे दर आणखीन घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.