पनवेल ः महिन्याभरातून नवी मुंबईतून १५ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणा-या टोळीने अजून दोन उच्चशिक्षितांना सव्वा दोन कोटी रुपयांना फसवले आहे. यामध्ये फसगत झालेले एका ४३ वर्षीय डॉक्टर तर दूस-या व्यवस्थापनात मास्टर पदवी मिळविलेल्या एका गृहिणीचा समावेश आहे. वारंवार आमिषाला बळी पडून उच्चशिक्षितांनी जागरुक राहण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
पहिल्या घटनेत वाशी येथील सेक्टर १७ ए येथे राहणा-या ४८ वर्षीय गृहिणीला जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शेअर खरेदी विक्रीमध्ये अधिकचा नफा मिळेल असे आमिष दाखवून या महिलेला विविध बॅंक खात्यांमध्ये १ कोटी ९२ लाख रुपये पैसे जमा करण्यास सांगीतले. तसेच दूस-या घटनेत उलवे वसाहतीमधील सेक्टर २३ ए मध्ये राहणा-या ४३ वर्षीय डॉक्टरला चार वेगवेगळ्या व्यक्तींनी संपर्क साधून शेअर ट्रेडींगमध्ये नफ्याचे आमिष दाखवून ३३ लाख पाच हजार रुपये वेगवेगळ्या बॅंक खात्यात जमा कऱण्यास भाग पाडले. नवी मुंबईत दोन महिन्यातील ही ३६ वी घटना आहे. संशयीत आरोप फोनवरुन संपर्क साधून शेअर ट्रेडींग व टास्क (ठरावीक काम) अशा वेगवेगळ्या कामाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करुन आमिष दाखवून फसवत आहेत.