नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार महिन्यांपासून संचालक मंडळाच्या बैठका होत नसल्याने बाजार समितीचे धोरणात्मक निर्णय पूर्णपणे ठप्प आहेत. कोणतेही निर्णय होत नसल्याने यंदा एपीएमसीतील मान्सूनपूर्व कमांचा पुरता बोजवारा उडाला आहे. मे महिना उजाडली तरी नालेसफाई तसेच बाजारातील अंतर्गत कामांना सुरुवातही झाली नाही. जोपर्यंत संचालक मंडळाचा तिढा सुटणार नाही, तोपर्यंत ही कामे रेंगाळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात पावसाचे पाणी साचू नये म्हणून त्या त्या प्रशासनाकडून विभागाअंतर्गत मान्सूनपूर्व कामे यामध्ये नालेसफाई, वृक्ष छाटणी, विद्युत कामे, रस्त्यांची डागडुजी केली जाते. एप्रिलमध्ये सुरुवात होऊन मे अखेरपर्यंत कामे पूर्ण होणे अपेक्षित असते. नवी मुंबई महापालिकेकडून शहरात नालेसफाई कामे सुरू झाली असून आतापर्यंत ७०% ते ८०% कामे पूर्ण झाली आहेत. एपीएमसी बाजार आवारातील ही मान्सूनपूर्व कामे सुरू होणे गरजेचे होते.

हेही वाचा… उसाचा रस पिणे पडले महागात, नजर हटी दुर्घटना घटी; १० मिनिटात रिक्षा चोरी

यासाठी मार्चमध्येच मान्सूनपूर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मे महिन्यादरम्यान बाजार आवारातील नालेसफाई, विद्युत कामे, रस्ते डागडुजी यांना सुरुवात होते. तसेच मे महिन्यापर्यंत कामे पूर्ण होतात. मात्र सध्या एपीएमसीमध्ये प्रशासक नाही, त्याचबरोबर संचालक मंडळाच्या बैठकाही होत नाहीत, त्यामुळे एपीएमसीमधील धोरणात्मक निर्णय शिवाय मान्सूनपूर्व कामे रखडली आहेत.

हेही वाचा… नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा निकाल १ मे ऐवजी ६ मे रोजी जाहीर होणार

आधीच पावसाळ्यात एपीएमसीमध्ये खड्डेमय रस्त्यांनी पाणी साचते, मात्र एक महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असून अद्यापपर्यंत एपीएमसीतील नालेसफाईला सुरुवातही झालेली नाही. त्यामुळे एपीएमसीमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the navi mumbai apmc the policy decisions of the market committee have been stuck as the board of directors meetings have not been held for the past four months dvr
Show comments