उरण : प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सोमवारी उरणच्या जासई या त्यांच्या जन्मगावी विविध कार्यक्रमांतून अभिवादन करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील कनिष्ठ महाविद्यालय दहागाव विभाग जासई यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते विद्यालयाच्या प्रांगणात दि.बा. पाटील साहेबांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यास व हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
हेही वाचा : पाणथळींपाठोपाठ नवी मुंबईतील बेटावर निवासी संकुले!
रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर आणि विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग, विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे,व इतर मान्यवरांच्या हस्ते दि.बा. पाटील साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दि.बा. पाटील साहेबांच्या जीवनावर भाषणे केली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा. अतुल पाटील यांनी दि.बा. पाटील यांचा जीवनपट आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर मांडला. या पुण्यतिथी कार्यक्रमास जासईचे सरपंच संतोष घरत, विद्यालयाचे व्हाईस चेअरमन डी. आर.ठाकूर,यशवंत घरत, रघुनाथ ठाकूर ,आदित्य घरत, बाबुराव मढवी,रमेश पाटील, सुभाष घरत,प्रकाश म्हात्रे, गिरीश म्हात्रे, माणिक म्हात्रे, अरुण म्हात्रे, नुरा शेख आणि शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.