उरण : किनाऱ्याची धूप व सुरू असलेली दुरावस्था थांबविण्यासाठी बांधण्यात आलेल्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे मोठं मोठे दगड पुन्हा एकदा निखळू लागले आहेत. त्यामुळे बंदिस्ती मधील मोठमोठे दगड समुद्रात कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात येणाऱ्या महाकाय समुद्राच्या लाटांमुळे पिरवाडी किनारा पुन्हा उद्धवस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पर्यटकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असलेल्या उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सुट्टीच्या दिवशी तर प्रचंड गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे या किनाऱ्यावर ओएनजीसी सारखा महत्वाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प व नागाव मधील लोकवस्ती आहे. मागील अनेक वर्षांत पावसाळ्यात येणाऱ्या समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे पिरवाडी किनाऱ्यावरील धूप वाढली होती. त्यामुळे येथील नारळी, पोफळीची झाडे उन्मळून निघत होती. त्याचप्रमाणे समुद्राचे पाणी नागाव परिसरात शिरत होते. परिणामी येथील विहीरीतील पिण्याचे पाणी व शेतीत ही समुद्राचे खारे पाणी येऊ लागल्याने समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर करण्यासाठी पिरवाडी किनाऱ्यावरील बंदिस्ती मजबूत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. याची दखल घेत सार्वजनिक बांधकामच्या किनारा विभागाने या किनाऱ्यावरील मजबूतीसाठी मोठमोठे दगड किनाऱ्यावर टाकून बंदिस्ती केली आहे. मात्र यातील अनेक दगड हळूहळू निखळू लागले आहेत. मोठ्या लाटांमुळे यात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. बंदिस्तीचे दगड निखळू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा : रायगड जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळा सुरूच
पिरवाडी किनाऱ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव
उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी या किनाऱ्याच्या विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी ३० कोटींचा निधी मिळविला आहे. या निधीतून किनाऱ्यावर बाग, चालण्यासाठी मार्ग, व्यायाम साहित्य, वाहनतळ व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.