उरण : लोकलमुळे उरण शहरातील कोंडीत अधिकची भर पडली असून सातत्याने होणाऱ्या कोंडीवर उपाय म्हणून सिडकोने उरण शहराला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाचे काम सुरू केले आहे. मात्र या बाह्यवळण रस्त्याची वाट बिकट झाली आहे. कारण हा मार्ग पूर्ण होण्यासाठीं सिडकोने निश्चित केलेली जून २०२४ पर्यंतची मुदत वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण हे सर्वात लहान शहर आहे. मात्र मागील ४० वर्षांत तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्याोगिक विकास वाढला आहे. त्यामुळे नागरीकरणातही वाढ झाली आहे. परिणामी शहरातील बाजारहाट करणारे नागरिक व त्यांच्या वाहनांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. यामध्ये सध्या तासाभरात ये-जा करणाऱ्या लोकलमुळे उरणचे प्रवेशद्वार असलेल्या कोटनाका येथे वारंवार कोंडीत भर पडत असल्याने नागरिक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा : फडणवीस यांची शिष्टाई; नाईक यांची नाराजी दूर

बाजारातील व्यावसायिकांचीही संख्या वाढली आहे. शहरात वाहनतळ नाही. त्यामुळे उरण शहरातील वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. सध्या तर बाजारात नागरिकांना कोणत्याही वेळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून सिडकोच्या माध्यमातून उरण पनवेल राज्य महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळून बाह्यवळण रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी सिडकोने निधी ही मंजूर केला आहे. मात्र अनेक परवानग्यांमुळे काम रखडले होते. या सर्व परवानग्या मिळाल्या असून फेब्रुवारीपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा रस्ता काही ठिकाणी जमिनीवर तर काही भाग हा उड्डाणपूल मार्गे आशा प्रकारचा असणार आहे. यातील जमिनीवरील रस्त्याच्या कामाने वेग घेतला असला तरी उड्डाणपूल उभारणीला सुरुवात होण्यास उशीर होणार आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

यासंदर्भात सिडकोने जून २०२४ पर्यंत पूल आणि रस्त्याच्या कामाची मुदत दिली होतो. मात्र या कालावधीत हा रस्ता तयार करण्याचे सिडकोचे प्रयत्न असले तरी कामाचा वेग पाहता मार्ग पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran delay in completion of bypass road which is constructed by cidco to avoid traffic jam in city css
Show comments