उरण : उरण शहरातील स्वामी विवेकानंद चौक, पेन्शनर्स पार्क (वैष्णवी हॉटेल) वळणावर नागरिक आणि विद्यार्थ्यांना भर दुपारी कडक उन्हात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी पुन्हा एकदा आठवड्याच्या पहिल्या दिवशी ही कोंडी झाली होती. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी उरण नगर परिषद व उरण वाहतूक विभाग यांनी मागील वर्षी बैठकही घेतली होती. आणि काही उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा एकदा या कोंडीचा सामना करावा लागत आहे.

उरण शहरात सेंट मेरीज स्कूल (गणपती चौक), खिडकोळी नाका (राजपाल हॉटेल) जरीमरी मंदिर, कोटनाका, पालवी रुग्णालय त्याचप्रमाणे कामठा रस्त्यावरही वाहनांची कोंडी होऊ लागली आहे. या वाढत्या कोंडीमुळे विद्याार्थी व पालकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे वाहतूक विभाग व नगर परिषदेने या कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा… ऑक्टोबरच्या उन्हात अंगाची काहिली शमविणारे ताडगोळे उरणच्या बाजारात; आगमनाला दर चढे

उरण शहरातील उरण एज्युकेशन सोसायटी व रोटरी स्कूल ही विद्याालये एकाच परिसरात आहेत. येथील विद्यााथ्र्यांना ये-जा करण्यासाठी स्वामी विवेकानंद चौकातून जावे लागते. मात्र या चौकात मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे विद्यााथ्र्यांना ने-आण करणारी तसेच विद्याार्थी घेऊन जाणारी पालकांची वाहने ही एकाच वेळी येत असल्याने चौकात कोंडी होत आहे. हा मार्ग प्रचंड रहदारीचा आहे. त्यामुळे अचानक वाढणाºया वाहनांमुळेही कोंडीत भर पडत आहे. त्याचप्रमाणे गणपती चौक ते खिडकोळी नाका आणि कामठा रस्त्यावर सेंट मेरीज स्कूलमधील विद्याार्थी ये-जा करीत असताना याही मार्गावर कडेला उभी करण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

हेही वाचा… ऐरोली-काटई मार्गावर नवी मुंबईतून जोड मार्गिका; ५० कोटींचे कंत्राट बहाल, लवकरच कामाला सुरुवात

सध्या ऑक्टोबर हीटमुळे प्रचंड ऊन लागत असून विद्याार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना भोवळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील कोंडीवर नगर परिषद आणि वाहतूक विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत घरत यांनी केली आहे. उरणमधील ठिकठिकाणी होणाºया कोंडीवर उपाययोजना केल्यास विद्याार्थी व उरण शहरात येणाºया प्रवाशांनाही दिलासा मिळू शकेल.

Story img Loader