उरण : उष्णतेची लाट सुरू असून माणसाला या उष्म्याच्या झळा सोसाव्या लागत असताना वन्यजीवांची काळजी करीत चिरनेरमधील जंगलात कोरड्या पडलेल्या पाणवठ्यात ड्रमने पाणी वाहून नेत हे पाणवठे भरले जात आहेत. उरणच्या निसर्गप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा :नवी मुंबईत ५३५ आणि पनवेलमध्ये ७९ धोकादायक बांधकामे

सध्या पारा ४० अंश पार जाऊ लागला आहे. त्यामुळे घरातून कामाशिवाय बाहेर पडू नका, उष्णतेपासून संरक्षण करा, उन्हाळ्यात सुरक्षा म्हणून साहित्य वापरा आदी सूचना केल्या जात आहेत. मात्र माणसाप्रमाणेच वन्यजीवांच्या जिवालाही या वाढत्या उष्णतेची झळ पोहचत आहे. त्यातच जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्राोत कमी झाले आहेत किंवा नष्ट केले आहेत. त्यामुळे वन्यजीवांची होणारी काहिली थांबविण्यासाठी चिरनेरच्या फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेचे संस्थापक जयवंत ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ड्रमच्या साहाय्याने दुरून पाणी वाहून आणीत कोरडे झालेले पाणवठे पुन्हा भरण्याचे काम सुरू केले आहे. परिसरातील वन्यजीवांची अधिवास असलेल्या जंगल आणि डोंगर परिसरात माती काढण्यासाठी सपाटीकरण सुरू आहे. त्यामुळे वन्यजीवांची आणि पक्ष्यांची स्थाने उद्ध्वस्त केली जात आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran friends of nature foundation initiative of watering in dry watersheds for wild animals css
Show comments