उरण : शनिवारी दुपारी उरण तालुक्यातील मोठी जुई येथील माजी सरपंच वसंत भोईर हे बहिणीकडे लग्नसोहळा आटोपून आपल्या दुचाकीवरून परतत असताना चिर्ले गावानजीक झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य मार्गावर बेकायदा उभ्या करण्यात आलेल्या अवजड कंटेनर वाहनांमुळे हा अपघात झाला. त्यामुळे पुन्हा एकदा या बेकायदा अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या घटनेनंतर संतप्त गावकरी आणि महिलांनी घटनास्थळी रास्तारोको केला. यामुळे, उरण आणि पनवेलकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गावकऱ्यांनी केलेल्या रास्तारोकोमुळे दोन्ही मार्गांवर सुमारे ५ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी, पनवेलहून उरणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर टी- पॉईंट दरम्यान सुमारे आठ किलोमीटर वाहनांच्या रांगाही लागल्या होत्या. यावेळी जेएनपीटीच्या एनएच ४- बी मार्गावरील चिर्ले येथून मुंबईच्या दिशेने जाणारी उरण आणि पनवेलकडील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती.

हेही वाचा…एमएमआरडीएच्या अधिसूचनेवर ७ एप्रिलपर्यंत हरकती; उरण, पनवेल, पेण तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांकडून हरकतींची नोंद

यावेळी, या मार्गावरील कंटेनर-ट्रेलर्सच्या वाहतुकीमुळे अटल सेतूवर जाणारी वाहतूक सुमारे तीन ते चार तास ठप्प झाल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले होते. त्यामुळे पुन्हा एकदा उरणला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील होणाऱ्या अपघातांची त्यातील मृत्यूची चर्चा ऐरणीवर आली आहे.

या अपघातामुळे उरणच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला असून रस्त्यात खड्डे होते. त्यावेळी ही अवजड कंटेनर वाहनांच्या धडकेत जीव जात होते. आता रस्ते सुसाट झाले तरीही हे संकट कायम असून यात वाढ झाली आहे. या बेदरकार वाहनांवर वाहतूक व्यवस्थेने नियंत्रण आणावे अन्यथा उरणकरांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराच नागरिकांनी दिला आहे.

हेही वाचा…ठाणे बेलापूर एमआयडीसी पावणेतील कंपनीला भीषण आग

जेएनपीटी बंदरामुळे द्रोणागिरी आणि उरणमधील गोदाम परिसरातील रहदारीच्या रस्त्यावर बेकायदा अवजड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहनांच्या अवजड कंटेनरच्या धडकेत अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या अपघातात घरातील कर्ती व्यक्ती गमवावी लागल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत.

रस्त्यावरील या यमदूतरूपी कंटेनरना आणखी किती बळी हवेत असा सवाल आता येथील वाहनचालक व जनतेकडून केला जात आहे. कारण यातील बहुतांशी अपघात हे रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या बेकायदा कंटेनर वाहनांमुळे झाले आहेत किंवा भरधाव कंटेनर वाहनाने धडक दिल्याने झाले आहेत.

हेही वाचा…व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

जेएनपीटी बंदरातील मालाची ने-आण करणारी दहा हजारांहून अधिक कंटेनर वाहने दररोज उरणमधील दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करीत आहेत. या कंटेनर वाहनांच्या बेदरकारीमुळे ३४ वर्षांत शेकडो दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सुरुवातीला अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे तर सध्या रस्ता रुंदीकरणानंतर जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पळस्पे या दोन्ही मार्गावर बेकायदा उभ्या करण्यात आलेल्या कंटेनर वाहनांचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या जेएनपीटी ते किल्ला (नवी मुंबई) व जेएनपीटी ते पळस्पे या दोन्ही राष्ट्रीय मार्गावर उरण सामाजिक संस्थेने केलेल्या आंदोलनामुळे प्रवासी वाहतूक व गावांना जोडणाऱ्या सेवा (सर्व्हिस) मार्गाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र हे सेवा मार्गच कंटेनर वाहनांमुळे वाहनतळ झाले आहेत. त्यामुळे प्रवासी व दुचाकी वाहने मुख्य मार्गाचा वापर करीत आहेत. याचा फटका या वाहनांना बसून अपघातांत वाढ झाली आहे. या कंटनेररूपी यमदूतानी आतापर्यंत उरणमधील सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही बळी घेतले आहेत. त्यामुळे या यमदूतांना आणखी किती बळी हवेत असा प्रश्न केला जात आहे.

हेही वाचा…पनवेल : आयुक्तांअभावी महापालिकेचा कारभार रामभरोसे 

सेवा मार्ग सुरू करण्याची मागणी

उरणमधील नागरिकांच्यावतीने वारंवार करूनही ती सुरू केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. वाहतूक विभागाकडून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे १५ टक्के अपघात कमी करण्यात यश आले असल्याचा दावा वाहतूक विभागाने केला होता.